Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: डिचोलीतील चोरीप्रकरणात वास्को कनेक्शन उघड

बोर्डे येथील बंगल्यात चोरी प्रकरणी डिचोली पोलिसांनी दिल्लीतून येथून एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: बोर्डे येथील बंगल्यात चोरी प्रकरणी डिचोली पोलिसांनी दिल्लीतून येथून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. दीपकुमार श्रीवास्तव असे संशयिताचे नाव आहे. दक्षिणपूर्व दिल्ली पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. या चोरी प्रकरणात आणखीन दोघांचा सहभाग असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान या चोरीत वास्को कनेक्शनही समोर आले आहे.

साष्टीवाडा-बोर्डे येथील मुख्य रस्त्याजवळ व्यवसायाने सराफ असलेल्या मिलिंद शिरोडकर यांच्या बंद बंगल्यात ही चोरी झाली होती. गेल्या ६ नोव्हेंबर रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच वास्को पोलिसांनी शिरसई येथे राहणाऱ्या मूळ दिल्ली येथील अमीर शेख याला अटक केली होती. संशयित श्रीवास्तव हा अमीर शेख याच्या संपर्कात होता, असे तपासात समोर आले.

संशयिताकडून चोरीची कबुली

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विराज धाऊसकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक दिल्लीला पाठवण्यात आले.

या पथकात विशाल परब आणि प्रजल वेलिंगकर यांचा समावेश होता. दक्षिणपूर्व दिल्ली पोलिसांच्या मदतीने या पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताने चोरीची कबुली दिली असून अन्य दोन साथीदारांची नावे त्याने उघड केली आहेत.

बांगलादेशी टोळी ?

दरम्यान, या चोरीत बांगलादेशी टोळी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास हाती घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT