होंडा येथील शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी Dainik Gomantak
गोवा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम

होंड्यात मावळ्‍यांसह निघणार शिवरायांची मिरवणूक

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पोस्तवाडा-होंडा येथील शिवजयंती उत्सव समितीने होंडा पंचायतीच्या सहकार्याने शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी समितीची निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी बाबुली वाळके यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. तसेच विविध समित्या निवडण्‍यात आल्‍या.

शनिवारी दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवरायांची मावळ्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात येईल. पोस्तवाडा येथून ही मिरवणूक सुरू होऊन ती गावकरवाडा, बोडणवाडा, सालेली, भुईपाल, सोनशी, सोलये, होंडा-तिस्क, नारायणनगर येथे फिरून पोस्तवाडा येथे विसर्जित होईल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्‍या हस्ते पुष्पहार अर्पण, शिवप्रतिमेचे पूजन, बाबुली वाळके यांचा सत्कार व नंतर ‘लोकनृत्याविष्कार’ हा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आत्माराम गावकर, प्रमुख वक्ते म्हणून केरी येथील विवेकानंद मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपिनाथ गावस, समितीचे अध्यक्ष बाबुली वाळके, सन्माननीय अतिथी शिवदास माडकर, पंचायतीचे सर्व पंचसदस्य उपस्थित राहणार आहेत.

छत्रपतींच्‍या पुतळ्‍याचे करणार पूजन

उत्सव समिती: कार्याध्यक्ष आत्माराम गावकर (सरपंच होंडा), स्वागताध्यक्ष आनंद गावडे, उपाध्यक्ष शिवदास माडकर, गोविंद गावकर, कृष्णा गावकर, पांडुरंग गावकर, सचिव देऊ माईणकर, सहसचिव लखन गावकर, खजिनदार दशरथ गावकर, सहखजिनदार संतोष नावेलकर, सल्लागार सुरेश बर्वे, लक्ष्मण गावस, महेश गावकर व विठ्ठल पारवाडकर. तसेच यावेळी मिरवणूक समिती : दयेश गावकर (प्रमुख), रंगमंच समिती : संतोष नाईक (प्रमुख), कार्यक्रम समिती : गोविंद गावकर (प्रमुख), अल्पोपहार समिती : शिवदास माडकर (प्रमुख), सजावट समिती : प्रेमानंद नाईक (प्रमुख), प्रसिद्धी समिती : विठ्ठल पारवाडकर (प्रमुख) निवडण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT