History of Goa Liberation Dainik Gomantak
गोवा

स्वातंत्र्यसैनिकांचा अनमोल ठेवा आज गोमंतकीयांसमोर खुला होणार, पुराभिलेख सप्ताह प्रदर्शनाचे आयोजन

प्रदर्शन : राष्ट्रीय पत्रे, पुस्तके, कविता, पोस्टर, बॅनर, माहितीपत्रकांचा समावेश

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

पोर्तुगीज सरकारने अनुशासनहीन लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायालयाचा उपयोग मुंबई, पुणे, बेळगाव, कानपूरसह देशभरातून आलेल्या सत्याग्रही आणि सशस्त्र क्रांतिकारकांना शिक्षा देण्यासाठी केला.

या न्यायालयाने त्यांना कठोर शिक्षा दिल्या, त्रास दिला. इतरांनी गोवा मुक्तीच्या कार्यात भाग घेऊ नये, अशी भीती दाखवली. मात्र, गोवा मुक्तीचा लढा इतका प्रबळ होता की, हे न्यायालय त्यांच्या कारवाया रोखू शकले नाही.

स्वातंत्र्यसैनिकांना पोर्तुगीजविरोधी प्रचारासाठी शिक्षा झाली, तेव्हा त्यांच्याकडे राष्ट्रीय पत्रे, पुस्तके यासारखे जे काही सापडले, त्यांच्याकडून ती पत्रे, बॅनर जप्त केले आणि ते त्यांना शिक्षा करण्यासाठी पुरावे म्हणून वापरले.

हा अनमोल ठेवा आज गोमंतकीयांसमोर खुला करण्यात येत आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्याच्या मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याबद्दल स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ पुराभिलेख विभाग दरवर्षी १८ जूनपासून पुराभिलेख सप्ताह प्रदर्शन आयोजित करते.

गोवा मुक्ती चळवळीशी संबंधित पुराभिलेखागारामध्ये उपलब्ध विविध ऐतिहासिक नोंदी प्रदर्शित केल्या जात आहेत.

दोन ठिकाणी संधी

क्रांतिदिनी 18 जूनला मडगावच्या लोहिया मैदानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे प्रदर्शन सकाळी 11.30 वा. खुले करण्यात येईल. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित असतील.

तर पणजीत पाटो येथील संस्कृती भवनमधील प्रदर्शनाचे उदघाटन पुराभिलेख संचालक दीपक बांदेकर यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता होईल.

‘पोर्तुगीज हुकूमनामा’ पुस्तकाचे प्रकाशन

मोडी मराठीचे जाणकार रत्नाकर देसाई यांनी संपादित केलेल्या ‘पोर्तुगीज हुकूमनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. या पुस्तकात पोर्तुगीज सरकारच्या विशेषत: फोंडा महालाशी संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजाविषयी उल्लेख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT