Holi 2023 Dainik Gomantak
गोवा

Holi 2023 : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर वास्को बाजारपेठ होळीच्या रंगांनी सजली; लहानग्यांची दुकानांवर गर्दी

मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनासाठी वास्कोतील बाजारपेठ विविध रंगांनी सजली आहे.

दैनिक गोमन्तक

Holi 2023 : मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनासाठी वास्कोतील बाजारपेठ विविध रंगांनी सजली आहे. रंगपंचमी साठी पिचकाऱ्या, मुखवटे यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या वस्तू बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

उद्या (सोमवारी) होळी पूजन आहे; तर मंगळवारी रंगपंचमी म्हणजेच धुलिवंदन साजरे होणार आहे. त्यासाठी लागणारे रंग, पिचका-या, मुखवटे, टोप्या, लहान फुगे बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत.

रासायनिक रंग हानिकारक असल्याने लोक नैसर्गिक रंगाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे रंगपंचमीच्यावेळी लोक नैसर्गिक रंग खरेदी करताना दिसत आहेत. रासायनिक रंग मार्केटमध्ये 120 रुपये प्रति किलो या किमतीत विकले जात आहेत.

तर नैसर्गिक रंग 600 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. तसेच प्रत्येक रंगाची लहान पाकिटे 10 रुपये प्रतिनग प्रमाणे विकली जात आहेत. याव्यतिरीक्त रंगीत मुखवटे बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. 50 रुपयांपासून ते अगदी 500 रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे मुखवटे लहान मुलांसाठी आकर्षणच बनले आहेत.

कापसापासून तसेच कपड्यापासून तयार केलेले पर्यावरणपूरक असे मुखवटे बाजारात विक्रीस ठेवण्यात आले आहे. रंगांप्रमाणे पिचकारीलाही जास्त प्रमाणात मागणी असून 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंतच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या आकर्षक रंगाच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून रंगपंचमीला लागणारे रंग, पिचकाऱ्या, मुखवटे घेण्यास लोकांनी सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT