Indian Railway Dainik Gomantak
गोवा

दिव्यांग वडील, दोन भावांची खांद्यावर जबाबदारी; नोकरीच्या शोधात गोव्यात येताना गरीब घरातील तरुणावर काळाचा घाला

Varanasi Train Accident: खाली पडल्यानंतर रुळाच्या संपर्कात आलेल्या आनंदच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या.

Pramod Yadav

Varanasi Train Accident

वाराणसी: भदोही जिल्ह्यातील एका युवकाचा वाराणसी जंक्शन येथे दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रेन अपघातात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. मृतदेह घरी पोहोचताच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. मृताचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे.

आनंद कुमार (वय 28, रा. गदौरा, जिल्हा -भदोही) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

आनंद रविवारी गदौरा येथून गोव्याला येत होता. गोव्याला येण्यासाठी तो वाराणसी जंक्शनला पोहोचला. दरम्यान, गोव्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना आनंदचा अचानक पाय घसरला आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर रुळाच्या संपर्कात आलेल्या आनंदच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या.

जखमी झालेल्या आनंद कुमारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. पघाताच्या वेळी त्याच्यासोबत त्याच्या गावातील कलंदर हा आणखी एक तरुणही येथे उपस्थित होता.

आनंद कुमार हा दोन भावांमध्ये मोठा असून त्याचे वडील दिव्यांग आहेत. आनंदचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात तो गोव्यात येत होता दरम्यान, त्याचा अपघातात मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT