Vande Bharat Express Dainik Gomantak
गोवा

Vande Bharat Express: ‘वंदे भारत’ ठरेल पर्यटन वृद्धीचे महाद्वार! गोवा-मंगळुरूसाठी फायदेशीर

दक्षिण मंगळुरू शहर मतदारसंघाचे आमदार वेदव्यास कामथ यांचे मत

दैनिक गोमन्तक

सुशांत कुंकळयेकर

मडगाव ते मंगळुरू या मार्गावर चालू झालेली ‘वंदे भारत’ ही ट्रेन गोवा तसेच मंगळुरू या दोन्ही प्रदेशांच्या पर्यटनवृद्धीचे महाद्वार ठरेल, असे मत दक्षिण मंगळुरू शहर मतदारसंघाचे आमदार वेदव्यास कामथ यांनी व्यक्त केले.

शनिवारी (ता.३०) मंगळुरू सेंट्रल या स्टेशनवरून दुपारी १२.१५ वाजता या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखविला. सर्वांनी जल्लोषात या रेल्वेचे स्वागत केले. यावेळी मंगळुरू-गोवा या मार्गावर ही रेल्वे सुरू व्हावी, यासाठी मोलाची भूमिका बजावणारे मंगळुरूचे खासदार नलीन कुमार कटील हेही उपस्थित होते.

लवकरच मंगळुरू-कोची वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार, अशी घोषणा त्यांनी केली. अन्य दोन ठिकाणांशी मंगळुरूहून ‘वंदे भारत’ जोडली जाणार, असे त्यांनी सांगितले.

धार्मिक पर्यटनही वाढेल ः कामथ

कामथ म्हणाले, मंगळुरू शहरात जे कोकणी भाषिक राहतात त्यांचे कुळदेव गोव्यात आहेत. त्यामुळे मंगळुरू आणि गोवा यांच्यात नेहमीच संपर्क असतो. आता वंदे भारत सेमी सुपरफास्ट ट्रेन सुरू झाल्याने ते सकाळी मंगळुरूहून दुपारपर्यंत गोव्यात दाखल होऊ शकतील आणि आपली देवकार्ये उरकून परत सायंकाळी आपल्या गावी परतू शकतील. त्यामुळे गोव्यातील धार्मिक पर्यटनही वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT