Inspirational
Inspirational Dainik Gomantak
गोवा

Inspirational: वामन सरदेसाईंचा लढाऊ बाणा प्रेरणादायी !

गोमन्तक डिजिटल टीम

Inspirational पोर्तुगीज राजवटीत स्वातंत्र्यसैनिकांनी जे राजकारण केले ते गोव्याच्या हितासाठी. गोवा मुक्त व्हावा यासाठी होते, स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हते. वामन सरदेसाई हे पूर्वीपासूनच सत्याग्रही वृत्तीचे होते.त्यांचा लढाऊबाणा इतरांसाठी प्रेरणादायी होता.

भारताला ब्रिटिशांपासून स्वांतत्र्य प्राप्त झाले, तसाच गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त व्हावा, हेच आमचे ध्येय होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी लिबिया लोबो सरदेसाई यांनी सांगितले.

स्वातंत्र्यसैनिक वामन सरदेसाई यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून पोर्तुगीजांविरूद्ध रेडिओ केंद्र सुरू करण्याचा विचार केला, त्यावेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

मी घरात माझी बेळगावला कामानिमित्त बदली झाल्याचे सांगितले. पहिल्यांदा आंबोली येथून रेडिओची सुरूवात करायचे ठरविले.

परंतु गोव्याला नजीक असल्याने तसेच गोवेकर ये-जा करत असल्याने येथे सुरूवात करणे योग्य ठरणार नाही, याचा विचार करून शेवटी कॅसलरॉक येथे मी आणि वामन सरदेसाई यांनी भूमिगत ‘सोडवणेचो आवाज’ या रेडिओ केंद्राची सुरूवात करायचे ठरविले.

रेडिओसाठी पोर्तगीज ट्रान्समीटर

1954 साली नगर हवेली स्वतंत्र झाली होती. तेथील स्वांतंत्र्यसैनिकांपाशी पोर्तुगीजांचे दोन ट्रान्समीटर होते. ते ट्रान्समीटर कॅसलरॉक येथे आणण्यात आले आणि एका ट्रक मध्ये रेडिओची सुरूवात करण्यात आली.

सकाळी 7 आणि सायंकाळी 7 वा. आम्ही कोकणी आणि पोर्तुगीजमधून कार्यक्रम करायचो. यामध्ये स्वातंत्र्य आम्हाला कशासाठी हवे याबाबत सांगायचो.त्यासोबतच पोर्तुगीज रेडिओवर केवळ भारतात वाईट काय घडले तर तेवढेच सांगितले जायचे.

परंतु आणि खरी वस्तुनिष्ठ माहिती आम्ही सांगत असू. सीमेवरील पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळत असे. भारत सरकारने आम्हाला त्याकाळी रेडिओ किंवा इतर बाबींसाठी अडविले नव्हते,असेही सरदेसाई यांनी सांगितले.

तो अनपेक्षित आनंद होता....

गोवा मुक्तीला तीन दिवस असताना 16 डिसेंबर रोजी आम्हाला बेळगाव येथे आणण्यात आले. तेथून आम्ही दोन दिवस कार्यक्रम केले. तेथे आम्हाला जनरल चौधरी यांनी पोर्तुगीज भारतीय सैन्याला शरण आल्याचे सांगितले. त्यावेळी जो आनंद झाला तो अनपेक्षित हर्षोल्हास होता.

आजच्या नवयुवकांना गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. युवकांना त्यातून एक स्फूर्ती मिळेल, असे लिबिया लोबो सरदेसाई यांनी सांगितले.

आवाजही पहचान है !

आम्ही कॅसलरॉकच्या जंगलात वास्तव्य करून 6 वर्षे रेडिओ केंद्र चालविले. आमचे कार्यक्रम गोवेकरांच्या काळजाला भिडत होते. मी ज्यावेळी बोलते त्यावेळी अनपेक्षितपणे लोक माझ्याकडे पाहतात. कारण गोवेकरांच्या कानावर माझा आवाज पडत होता. तो त्यांच्यासाठी ओळखीचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: मंडूर येथे भिंत कोसळल्याने माय लेक ठार!

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT