Sattari Storm Damage Dainiak Gomantak
गोवा

Sattari Storm Damage: सत्तरीला वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाचा तडाखा; अवकाळी पावसाचा कहर; हिवरे बुद्रूकमध्ये घरांचे नुकसान

Valpoi Unseasonal Rain: वाळपईसह संपूर्ण सत्तरी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: वाळपईसह संपूर्ण सत्तरी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले. विशेषतः ठाणे-डोंगुर्ली परिसरातील हिवरे बुद्रुक गावाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून अनेक घरांवर झाडे कोसळली. पत्रे आणि कौले उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने पावसाला सुरवात झाली. काही भागांत मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मात्र, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. हिवरे बुद्रूक गावात चक्रीवादळामुळे अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार देवकी देवू गावकर आणि कृष्णा गणेश गावकर यांच्या घरांवर मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने घरांचे छप्पर कोसळून मोठे नुकसान झाले.

या दोन्ही घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अंजली अनिल गावकर यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेली, तर गोपिका गोपाळ गावकर यांच्या घरावरील कौले वाऱ्याने उडाली. जानकी तानावडे यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे, कौले आणि इतर साहित्य उडून गेले आहे

. रात्र झाल्याने अनेक ठिकाणच्या नुकसानीचा पूर्ण अंदाज मिळू शकला नाही. काही घरांवर पडलेली झाडे अंधारामुळे हटविणे शक्य नसल्याने ती सकाळी हटविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. घटनांची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान विविध ठिकाणी धावून गेले. ‘एलएफएफ’ ए. एन. देसाई यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी मदतकार्य सुरू केले.

अग्निशमन दलाकडून ठिकठिकाणी मदतकार्य

  • चोर्लाघाट परिसरात रस्त्यावर झाड कोसळल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल होऊन जवानांनी मदतकार्य करत रस्त्यावरील झाड बाजूला केले.

  • पर्ये येथील भूमिका हायस्कूलजवळ रस्त्यावर जांभळाची फळे पडल्याने रस्ता निसरडा बनला होता. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडल्या.

  • बिंबल-सत्तरी येथील गणपती मंदिराजवळही आंब्याची फळे रस्त्यावर पडल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. दुचाकीस्वार पडण्याची ही घटना घडली.

  • हिवरे-माडळवाडा येथील अंगणवाडीजवळ एका घरावर आणि रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले. या ठिकाणीही अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT