वाळपई: वेळूस-वाळपई येथील नगरपालिका प्रभाग १ मधील गरीब महिला कमल ऊर्फ सीता रामा पालकर यांच्या मातीच्या घराची भिंत काही दिवसांपूर्वी कोसळणाऱ्या पावसात जमीनदोस्त झाली आहे. त्यात इतर घरातील भिंती व छतही कमकुवत झाले असून तेही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे या महिलेला आधाराची गरज आहे.
सविस्तर वृत्त असे की, वेळूस प्रभाग १ मधील गरीब महिला सीता पालकर यांचे संपूर्ण घर मातीचे आहे. घर जुने झाल्याने वरचे छतही कमकुवत झालेले आहे. त्यांना कोणाचाही आधार नाही. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने घरदुरुस्ती वेळेवर न झाल्याने काही दिवसांपूर्वी पडणाऱ्या पावसात घराची मोठी भिंत जमीनदोस्त झाली आहे.
त्यात पत्रे व इतर साहित्याचे नुकसान झाले. घर पडून कित्येक दिवस झाले तर अजूनपर्यंत कोणीच तिला आधार दिलेला नाही. तिचा मोठा मुलगा कोरोनाच्या काळात वारला तर लहान मुलगा सचिन हा तिच्यासोबत राहातो. तो बेरोजगार असून त्याची मानसिक स्थिती खालावल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महिन्याला मिळणाऱ्या गृहआधाराच्या दीड हजारांवर त्या आपली व मुलाची गुजराण करतात.
देवही परीक्षा घेतो. हे आमचे जुने घर. पूर्वी एकत्र कुटुंब होते. कालांतराने बाकी दीर व इतरांनी आपआपले संसार थाटले. आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही याच घरात राहिलो. आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने घर दुरुस्त करता आले नाही. अशा परिस्थितीत सध्या आम्ही दिवस काढत आहोत. - सीता पालकर, वेळूस
बाप्पाला बसवणार कुठे?
काही दिवसांपूर्वी घराची भिंत कोसळली. कित्येकजणांनी येथे येऊन पाहणी केली. मात्र, अजूनपर्यंत कोणीच मदत केलेली नाही. त्यामुळे जे होते ते होऊ दे असे म्हणून याच घरात राहते आहे. आता मला चिंता आहे ती, काही दिवसांत येणाऱ्या गणेशचतुर्थीची. या मोडलेल्या घरात बाप्पाला कसे बसविणार. त्यात मुलगा सतत आजारी असल्याने त्याला वारंवार डाॅक्टरकडे न्यावे लागते. मला खरीच मदतीची गरज आहे, असे सीता पालकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.