Valpoi Dainik Gomantak
गोवा

Valpoi: भलेमोठे झाड पडले उन्मळून, 2 तास रस्ता बंद; वाळपई फोंडा मार्गावरील घटना

Valpoi Ponda Road: सत्तरी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचा प्रकार घडले.

Sameer Panditrao

वाळपई: सत्तरी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याचा प्रकार घडले. वाळपई फोंडा मार्गावरील सावर्शे येथे अजय पाटील यांच्या पेट्रोलपंपावर जवळील मुख्य रस्त्यावर भले मोठे आंब्याचे झाड सोमवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान उन्मळून पडले, त्यामुळे दोन तास वाहतूक खोळंबली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

हा रस्ता मुख्य असून नेहमी या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असते. मात्र ज्यावेळी झाड पडले त्यावेळी येणारी वाहने लांब असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या.

दरम्यान, वाळपई अग्निशमन दलाला कळविल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. दोन तासानंतर दुचाकींसाठी वाहतुकीस रस्ता खुला केला. सावर्शे येथील उपसरपंच रूपाली गावकर तसेच माजी पंच समीर बागी यांनी जेसीबी उपलब्ध करून दिली.

सुमारे चार तासांनंतर रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला. वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देसाई, तुळशीदास झर्मेकर, एम.एस गावडे, के. एच. गावकर, जी.आर. देगवेकर, पी.एस. गावकर, रूपेश सालेलकर, आर. यु. गावकर आदींनी मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: ‘उत्कृष्ट शिक्षक’ प्राध्यापकास पूर्ण सेवावाढ, सर्व लाभ द्या! गोवा विद्यापीठाला न्यायालयाकडून मुदतवाढीचे निर्देश

Goa News Live: अमित शहा आज गोव्यात, विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

Mayem: 250 वर्षांपासूनची परंपरा, पोर्तुगीज काळापासून होतेय मयेतील ‘मेस्तां’च्या शाळेत सरस्वती पूजन

ED Raid: ‘ईडी’ची मोठी कारवाई! 61 लाखांची मालमत्ता जप्त; पोंझी स्कीमधून 9.33 कोटीच्या फसवणुकीचा दावा

Chimbel: 'पणजीला पाण्याची गरज लागेल तेंव्हा चिंबलमधील तळे मदतीला येईल'! शिरोडकरांचा दावा; प्रकल्पांना विरोध कायम

SCROLL FOR NEXT