Goa Valpoi Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: वाळपई पोलिस 'ॲक्शन मोड'नंतर पालक आले भानावर; कारवाईची अल्पवयीन चालकांना धास्ती

Goa Police: वाळपई पोलिसांनी अल्पवयीन चालकांसाठी खास मोहीम राबवून त्यांची धरपकड सुरु केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police: दुचाकी व चारचाकी वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन चालकांसाठी गेल्या दोन दिवसांपासून वाळपई पोलिसांनी खास मोहीम राबवून त्यांची धरपकड सुरू केली आहे. गुरुवारी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल 50 जणांवर कारवाई केल्यानंतर ही संख्या बऱ्याच प्रमाणात घटली. दुसऱ्या दिवशी मात्र एकही अल्पवयीन वाहनचालक रस्त्यावर फिरताना दिसला नाही. त्यामुळे पालक आणि अल्पवयीन मुलेही भानावर आली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

गोवा राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र वाढू लागले आहे. विनापरवाना वाहने चालविणे व अल्पवयीन मुलांनी वाहने चालविण्याचे प्रकारही वाढीस लागल्यामुळे अपघातांत वाढ होऊ लागली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहने चालवायला देऊ नयेत, अशी विनंती केली होती. तरीही राज्याच्या अनेक भागांत अल्पवयीन चालक वाहने चालवताना दिसत होते. त्यामुळे गुरुवारपासून ही मोहीम सुरू केली आहे. काल दिवसभर वाळपई शहराच्या अनेक भागांत पोलिसांची गस्त सुरू होती.

यापुढेही मोहीम सुरूच राहणार

वाळपई सरकारी रुग्णालयाच्या परिसरामध्ये हाती घेतलेल्या मोहिमेवेळी गुरुवारी पहिल्याच दिवशी तब्बल 50 अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना दंडही ठोठावण्यात आला. मोटार वाहन कायद्यामध्ये केलेल्या बदलानुसार आता अल्पवयीनांच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी वाळपई तसेच केरी चेक पोस्टजवळ पोलिसांची गस्त सुरू होती. मात्र, एकही अल्पवयीन चालक मिळाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाळपई शहरात ही मोहीम अशीच सुरू राहाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

उशिरा का होईना, पालक जागे

गुरुवारी वाळपईत अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे सरकारने जो निर्णय घेतला आहे तो योग्य असून यापुढे अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई होईल व गाड्या जप्त केल्या जातील, या कारणास्तव पालक व मुलांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपघातांना आळा बसेल. मात्र, पोलिसांनी ही मोहीम सुरूच ठेवावी, असे काहींचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT