Valpoi  Gomantak Digital Team
गोवा

Valpoi News : वाळपईतील कामे ३० मेपर्यंत पूर्ण करणार : मुख्याधिकारी

सत्तरीतील बाराही पंचायत क्षेत्रांत कामे अंतिम टप्प्यात

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई पालिका क्षेत्रातील माॅन्‍सूनपूर्व कामे ३० मेपर्यंत मार्गी लावण्‍यात येणार आहेत. सध्या ही कामे युद्धपातळीवर सुरू असून वेगवेगळ्या ठिकाणी गटार उपासण्‍याचे काम सुरू आहे. सर्व प्रभागांतील कामे टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हाती घेण्यात येतील, असे वाळपईचे मुख्याधिकारी दशरथ गावस यांनी सांगितले.

वाळपई नगरपालिका क्षेत्रात एकूण १० प्रभाग आहेत. सर्व प्रभागांमधील गटार उपासण्‍याचे काम पंधरा दिवसांपूर्वी हाती घेण्यात आलेले आहे. तसेच गटाराच्या बाजूला असलेली झाडेझुडपे, त्यांची छाटणी, कचरा उचलणे आदी कामे करण्यात येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली अनेक गटारे कचऱ्याने भरलेली आहेत.

त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्‍यता आहे. नाल्यांबरोबरच नदींचीही साफसफाई करण्यात येणार आहे. मात्र सदर काम जलसिंचन खात्यातर्फे करण्यात येते. यामुळे नगरपालिकेने सदर प्रस्ताव संबंधित खात्याला पाठविला आहे. दरम्‍यान, तालुक्यातील बाराही पंचायत क्षेत्रात रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे बहुतांश पंचायतींचा भाग चकाचक झालेला आहे.

गटारांवरील लाद्या गायब

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसरात काही ठिकाणी गटारांवरील लाद्या गायब आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी उघड्या गटारांत मोठ्या प्रमाणात कचरा आढळतो. वाळपई उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तरी तालुक्यात धोकादायक झाडे छाटण्याचे काम टप्प्याटप्याने हाती घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT