Valpoi Dam Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : सत्तरीत आंघोळीसाठी बंधारे हाऊसफुल!

तापमान वाढीचा परिणाम म्हादई, वेळूस, रगाडा, वाळवंटी नदीपात्रात छोट्या मुलांचीही गर्दी

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे आबालवृद्धांचा नदी, नाल्यातील पाण्‍याच्या ठिकाणी आंघोळीसाठी गर्दी होत आहे. सत्तरी तालुक्यात म्हादई, वेळूस, रगाडा, वाळवंटी नदी पात्रात बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्या ठिकाणी सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे.

जलसिंचन खात्यातर्फे उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात नागरिक आंघोळ करताना दिसत आहेत. खास करून रविवार व सुट्टीच्या दिवशी प्रचंड प्रमाणात नागरिकांचा मोर्चा नदीच्या पाण्यावर वळताना दिसतात. शुक्रवारी ‘गुड फ्रायडे’ची सुट्टी असल्याने अनेकांनी उस्ते येथील बंधाऱ्यावर मनसोक्त आंघोळीचा आनंद लुटला.

Valpoi Dam

सत्तरी तालुक्यात तसेच अनेक पर्यटक ठिकाणे आहे. मात्र उस्ते या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बंधारा आंघोळीसाठी अत्यंत चांगला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक सदर ठिकाणी भेट देत आहेत. रविवारच्या दिवशी जवळपास दीड-दोन हजारापेक्षाही अधिक नागरिक सदर बंधाऱ्यावर आंघोळीसाठी येतात.

म्हादई नदीच्या उगम हा नानोडा, देरोडे येथून येऊन उस्ते येथे या नदीचा संगम होत आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील उस्ते या ठिकाणी उभारण्यात आलेला बंधारा पर्यटकांसाठी व नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे

Valpoi Dam

प्रदूषणविरहित पाणी

जवळपास १२० कोटी खर्चून सत्तरी तालुक्यातील म्हादई, वेळूस, रगाडा वाळवंटी अशा अनेक नद्यांवर बंधाऱ्यांचे माळ उभारण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होऊ लागला आहे. म्हादई नदीचे पाणी हे प्रदूषणविरहित आहे. यामुळे या नद्यांवर अंघोळ करणे ही खरोखरच समाधानकारक बाब आहे.

सत्तरीत पावसाळी पर्यटन वाढत असून उन्हाळ्यातसुद्धा पर्यटकांना सुविधा पुरवणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ठिकाणी नगरगाव पंचायतीने शौचालय, कपडे बदलण्यासाठी खोलीची सोय करावी. यासाठी आवश्यक शुल्क आकारल्यास पंचायतीच्या महसूलही मिळू शकतो. पर्यटनदृष्ट्या या भागाचा विकास केल्यास जनतेलाही लाभ होईल, असे ग्रामस्थांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT