Valpoi |Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: वाळपईत बेकायदा बांधकामावर नगरपालिकेचा हातोडा

बेकायदेशीररीत्या बांधकाम केलेल्या इमारतीतील गाळ्यांवर काल वाळपई नगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Illegal Construction: वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग-2 मधील वेळूस -वाळपई - ठाणे रोड येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेख दाऊद यांनी बेकायदेशीररीत्या बांधकाम केलेल्या इमारतीतील गाळ्यांवर काल वाळपई नगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली.

मंगळवारी जेसीपीच्या साहाय्याने बांधकाम पाडले आहे. वाळपईत अशा प्रकारे पहिल्यांदाच बांधकाम पाडण्याची घटना घडली आहे.

बेकायदा बांधकामाबाबत तक्रार 2017 साली मुबारक अली खान यांनी शेख दाऊद यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सदर खटला न्यायालयात सुरू होता. त्याचीच दखल घेत उच्च न्यायालयाने बेकायदा बांधकाम पाडण्याचा आदेश दिला होता.

त्यानुसार मंगळवार सकाळपासून बांधकाम पाडण्यासाठी वाळपई नगरपालिका, सत्तरी मामलेदार व इतरांची उपस्थिती होती. बांधकाम पाडण्यासाठी आलेली जेसीपी नादुरुस्त झाल्याने दुसरी जेसीपी दुपारी 2 वाजता आल्यानंतर बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सर्व बांधकाम टप्प्याटप्प्याने पाडण्यात आले.

सत्तरी मामलेदार दशरथ गावस, नगरपालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे, नगरपालिका अभियंता जयेश कळंगुटकर, नगरपालिका कर्मचारी, वाळपई पोलिस तसेच इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

उच्च न्यायालयाचा आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरपालिका मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे म्हणाले, हा आदेश उच्च न्यायालयाचा असून त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शेख दाऊद यांनी बांधकाम करताना वाळपई नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच मुबारक अली खान यांनी बेकायदेशीर बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT