Goa Velus Valpoi Bad Road  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News: वाळपई-वेळूस रस्त्याची दुर्दशा; वाहनचालकांना त्रास

Goa Roads: रस्ता खोदण्याच्या अगोदर दुरुस्ती कामाचे नियोजन सरकारने केले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील वेळूस येथील रस्त्याची दयनीय अवस्था बनलेली आहे.रस्त्यावर खड्डे पडून डबकी साचलेली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालवणे चालकांना त्रासदायक ठरत आहे.

येथील सुमारे दीडशे मीटर लांब रस्ता वीज केबल घालण्यासाठी जानेवारीत खोदण्यात आला होता. मात्र सात महिने उलटले तरीही रस्ता दुरुस्त केलेला नाही. रस्ता खोदण्याच्या अगोदर दुरुस्ती कामाचे नियोजन सरकारने केले नाही. त्यामुळे सरकार या भागात अपघात होण्याची वाट बघत आहे काय, असा संतप्त सवाल लोक करीत आहे.

हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा झाला आहे. आता श्रावण सण, नागपंचमी, चतुर्थी आदी सणावेळी लोकांची ये जा वाढणार आहे. यासंदर्भात आंबेडे येथील माधव वझे म्हणाले की, नगरगाव भागातून अनेकजण रोज वाळपईत जातात. वेळूस भागात चालकांना वाहन चालविताना नाकीनऊ येते. येथे दोन वाहने सुटणार नाही अशी स्थिती आहे.

गटारे गाळमातीने भरली

जानेवारीत खोदलेला रस्ता उन्हाळ्यात दुरुस्त करण्याची जबाबदारी शासनाची होती. त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्डेमय रस्त्यालगतची गटारेही गाळमातीने पूर्णपणे भरली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावर तुंबून राहाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये! सलग पराभवानंतर इमर्जन्सी बैठक; रोहित-कोहलीचं कमबॅक, श्रेयस अय्यरची कॅप्टन्सी आणि गंभीरच्या भूमिकेवर होणार मोठा निर्णय?

Rotary Rain Run Goa: रोटरी रेन रन मॅरेथॉनमध्ये महिला पेसर्स; 26 जुलै रोजी शर्यत; तीन हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित

Goa Bison Attack: भोम-देवसू येथे गव्याची दुचाकीला धडक, महिला गंभीर जखमी

Goa University: विद्यार्थ्यांचे जेवण अन् विश्‍वासाचा प्रश्‍न

VIDEO: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! उड्डाणानंतर काही सेकंदांत विमान क्रॅश, 10 जणांचा मृत्यू, थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT