Dr Yavanti Gaonkar Suspension News Dainiak Gomantak
गोवा

Goa Medical Negligence: उपचारातील निष्काळजीपणामुळे11 वर्षीय मुलाने गमावला पाय! आरोग्य खात्याकडून डॉक्टरांचे तत्काळ निलंबन

Dr Yavanti Gaonkar Suspension News: येथील सामाजिक आरोग्य केंद्रात फ्रॅक्चरवरील उपचारादरम्यान झालेल्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे ११ वर्षीय मुलाचा पाय कापावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वाळपई: येथील सामाजिक आरोग्य केंद्रात फ्रॅक्चरवरील उपचारादरम्यान झालेल्या वैद्यकीय निष्काळजीपणामुळे ११ वर्षीय मुलाचा पाय कापावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य खात्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. यवंती गावडे यांना तत्काळ निलंबित केले आहे. आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव डॉ. प्रणव भट यांनी निलंबन आदेश जारी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरगाव पंचायत क्षेत्रातील माळोली-सत्तरी येथील ११ वर्षीय मुलगा २७ एप्रिल रोजी खेळताना पडून जखमी झाला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे वाळपई सीएचसीतील एक्स-रे तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी प्लास्टर करण्याचे निर्देश दिले आणि उपचारानंतर मुलाला घरी पाठविण्यात आले.

मात्र दुसऱ्याच दिवशी मुलाला तीव्र वेदना, अस्वस्थता आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला पुन्हा सीएचसीमध्ये आणले. तेथून पुढील उपचारासाठी गोमेकॉत हलविण्यात आले. विविध तपासण्या आणि शस्त्रक्रियांनंतरही स्थिती सुधारली नाही. अखेरीस १ मे रोजी मुलाचा गुडघ्याखालचा पाय कापावा लागला. मुलाच्या कुटुंबीयांनी प्राथमिक उपचारात गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे. जखम आणि रक्तस्त्राव असूनही योग्य उपचार न करता थेट प्लास्टर करून घरी पाठविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. वेळेत योग्य उपचार झाले असते तर मुलाचा पाय काढावा लागता नसता, असेही त्यांनी म्हटले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेण्‍यात आलेली आहे. प्राथमिक उपचारात निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT