Delilah Lobo Dainik Gomantak
गोवा

Vagator Beachवर सुविधांचा अभाव; दिलायला लोबोंना मागण्यांचे निवेदन

Vagator Beach: तोडगा काढण्याचे आश्वासन आमदार दिलायला लोबोंनी दिले.

दैनिक गोमन्तक

Mapusa: वझरान-वागातोर येथे किनाऱ्यावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने या परिसरात पार्किंगसह योग्य रस्ता तसेच सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करावी, असे आवाहन करीत वझरानमधील शॅक मालकांनी शनिवारी 24 सप्टेंबर शिवोलीच्या आमदार दिलायला लोबोंना (Delilah Lobo) आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

दरम्यान, यासंदर्भात शॅकमालक श्रीधर गोलतेकर म्हणाले, कित्येक वर्षे हा किनारा प्रशासनाकडून दुर्लक्षितच आहे. या ठिकाणी योग्य रस्ता, पार्किंग व पथदीप नाहीत. तसेच चेंजिंग रुम व सार्वजनिक शौचालयांचा अभाव आहे. त्यामुळे पर्यटकांची विशेषतः महिलांची गैरसोय होते.

वझरान-वागातोर किनाऱ्यावर शौचालय तसेच विजेची समस्या प्रामुख्याने भेडसावते. त्यानुसार, येत्या मंगळवारी सकाळी जीटीडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही किनारी भेट देत पाहणी करणार आहोत. मुळात किनाऱ्यावर चेंजिंग रुम तसेच शौचालयांची नितांत गरज असते. तिथे पार्किंगचा अभाव आहे व पाण्याची समस्या आहे. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मी संबंधितांना दिल्याची प्रतिक्रिया आमदार दिलायला लोबोंनी यावेळी दिली.

स्थानिक पंचायत व पर्यटन खात्यामध्ये समन्वय नसल्याने या किनाऱ्यावर अजूनही पथदीप नाहीत. वेळेत किनाऱ्यावर मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या नाहीत, तर भविष्यात आमची उपजीविका ठप्प होईल, अशी भीती या शॅकमालकांनी व्यक्त केली आहे. तसेच सायंकाळनंतर अंधारामुळे पर्यटक येथे येण्यास घाबरतात.

याशिवाय येथे कचरापेट्या नाहीत, याकडे शॅकमालकांनी लक्ष वेधले. शॅक व्यवसायाच्या शुल्कवाढीसंदर्भात शॅकमालकांनी चिंता व्यक्त केली आहे. हा विषय मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांसमोर मांडणार आहोत, असेही लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT