Booster dose Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शंभर टक्क्यांनंतरही लसीकरण सुरूच

100.52 टक्के प्रमाण: 35 हजार 574 जणांना बूस्टर डोस

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात 100 टक्के लसीकरण झाले असले तरी अद्याप लसीकरण मोहीम सुरूच आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या आता 11 लाख 72 हजार 80 झाली असून हे प्रमाण 100.52 टक्के झाले आहे. राज्यात 11 लाख 66 हजार नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य ठेवले होते. तर राज्यात बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या 35 हजार 574 इतकी असून हे प्रमाण 28.62 टक्के इतके आहे. राज्यात बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असणाऱ्यांची संख्या 1 लाख 24 हजार 362 आहे. 15 ते 18 वयोगटातील पात्र मुलांची संख्या 74 हजार असून यापैकी 65 हजार 682 मुलांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून हे प्रमाण 88.76 टक्के आहे.

कोरोनाचे आणखी दोन बळी

राज्यात कोरोनाबाबत दिवसेंदिवस दिलासा मिळत असून गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 बळी असून अधिकच्या उपचारासाठी एका रुग्णाला दवाखान्यात भरती केले आहे. आज कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 1.23 टक्के इतका खाली आला. शुक्रवारी सक्रिय रुग्णांची संख्या 347 इतकी होती, तर गेल्या 24 तासांत नवे 32 बाधित रुग्ण सापडले. राज्यात आज 90 जण कोरोनातून बरे झाले. तर उपचारासाठी भरती केलेल्या तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात 347 सक्रिय रुग्ण

राज्यात आतापर्यंत 2 लाख 44 हजार 938 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 40 हजार 791 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.31 टक्के इतके आहे. सध्या राज्यात 347 सक्रिय रुग्ण असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूचा आकडा 3 हजार 800 झाला आहे. शुक्रवारी 2,587 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या. त्यापैकी 32 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT