Goa Government Job Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job: 22 खात्यांकडून रिक्त पदे जाहीर; नोव्हेंबरमध्ये जाहिरात जारी

Goa Government Job: नोव्हेंबरमध्ये जाहिरात जारी : ‘लोकसभे’पूर्वी होणार भरती

दैनिक गोमन्तक

Goa Government Job: पाटो-पणजी येथील स्पेसीस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राज्य कर्मचारी भरती आयोगाने वेगाने काम सुरू केले आहे.

त्यांनी मागवलेल्या माहितीला 22 खात्यांंनी प्रतिसाद देत कर्मचारी भरतीसाठी विनंती केली आहे. त्याला अनुसरून हा आयोग येत्या नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी भरतीची पहिली जाहिरात जारी करणार आहे.

लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीआधी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करणार आहे. यासाठी 22 खात्यांनी आपल्याला किती कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, याची माहिती राज्य कर्मचारी भरती आयोगाला कळवली आहे.

पुढील, नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य कर्मचारी भरती आयोग या भरतीसाठी जाहिरात जारी करणार आहे. जाहिरातीनंतर उमेदवारांना या आयोगाच्या संकेतस्थळावरच अर्ज करावा लागेल. आयोगच उमेदवाराला परीक्षेसाठी ओळखपत्र देणार आहे.

लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत याद्वारे आयोगच उमेदवाराची निवड करणार आहे. यापूर्वी खाती आपापल्या पातळीवर कर्मचारी भरती करत असत.

नियम अधिसूचित

कर्मचारी भरती आयोगाविषयी विधेयक संमत झाल्यानंतर आता भरतीविषयक नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. यामुळे एक नोव्हेंबरपासून होणारी कर्मचारी भरती ही आयोगामार्फतच होणार आहे.

राज्य सरकारने संबंधित खात्यांना सध्या सुरू असलेली खात्याच्‍या पातळीवरील कर्मचारी भरतीची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी, असे कळवले आहे.

...अशी होईल भरती

पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, लघुलेखक श्रेणी 2 आदी पदे आयोगाकडून भरली जाणार आहेत. यापूर्वी प्रत्येक खात्याकडे जाऊन उमेदवाराला अर्ज सादर करावे लागत असत.

मात्र, यापुढे एकत्रितपणे भरती होणार आहे. गोवा मुक्तीनंतर राज्य सरकार या पद्धतीने कर्मचारी भरती प्रथमच करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT