Utpal Parrikar Election Symbol Dainik Gomantak
गोवा

उत्पल पर्रीकरांचा आवाज निवडणुकीत घुमणार; मिळालं 'हे' चिन्ह!

'माईक' या चिन्हावर उत्पल पर्रीकर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Utpal Parrikar Election Symbol: भाजपतर्फे उमेदवारी नाकारण्यात आल्यावर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. पक्षातील खळबळीमुळे त्यांना इतर पक्षांनी ऑफर दिली असूनही त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला. कोणत्याही निवडणुकीत पक्षांची चिन्हे सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. ही चिन्हे त्या उमेदवारांची ओळखच असल्याने मतदार त्या चिन्हावरच त्यांना आपले मत देत असतात.

राजकीय आणि प्रमुख पक्षाची चिन्हे ठरलेली असतात. पण अपक्ष आणि इतर पक्षांना निवडणूक आयोगातर्फे (Election Commission) चिन्हे दिली जातात. यावर्षी उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार असून त्यांना आयोगातर्फे 'माईक' हे चिन्ह देण्यात आले आहे. याची माहिती त्यांनी 'पणजीकरांचा आवाज' असे म्हणत ट्वीटद्वारे आपल्या चिन्हाची माहिती गोवेकरांना दिली आहे. (Utpal Parrikar Latest News Updates)

माईक हे आपले मत ठामपणे मांडण्यासाठी, सर्वदूर आपला आवाज पोहोचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे उत्पल देखील या चिन्हाप्रमाणे सर्वदूर आपला बुलंद आवाज पोहोचवतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान उत्पल पर्रीकरांनी या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections 2022) आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांना जनतेचा पाठिंबा दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT