Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar: मी दिलेले औषध योग्य जागी लागल्यानेच जळजळ

Utpal Parrikar: उत्पल पर्रीकर यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी स्मार्ट सिटीचा विषय उकरून काढल्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली असून त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे.

दैनिक गोमन्तक

Utpal Parrikar: उत्पल पर्रीकर यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी स्मार्ट सिटीचा विषय उकरून काढल्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली असून त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. मी दिलेले औषध योग्य जागी लागले, हे आजच्या जळजळीवरून दिसून आले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी केव्हापासून खराब झाली, हे जनतेला माहीत आहे. पणजीत भाजपचा आमदार याआधी होता की नव्हता व भाजपच्या आमदाराने पणजीचा विकास केला की नाही याचे उत्तर भाजपने द्यायचे आहे.

याआधी पणजीत भाजपचा आमदार नव्हता, हे लहान मुलालादेखील पटणार नाही. स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यभरात भाजपची बांधणी केली, हे सर्वज्ञात आहे. निवडणूक हा धंदा मानून पक्षांतर करत निवडून यायचे.

ज्याला कोणताही वैचारिक वारसा नाही, ज्याची विचारांशी बांधिलकी नाही, अशांच्या मतप्रदर्शनावर मी बोलावे, असे नाही. भाजप सरकारमध्ये राहून स्व. पर्रीकर यांच्यावर तोंडसुख घेता येते का, याचा निर्णय भाजपने घ्यावा.

पर्रीकर यांनी पणजीत काय केले हे पणजीवासीयच सांगतील. त्यामुळे आजच्या आरोपांवर हसावे की रडावे, तेच समजत नाही. पणजीवासीय निवडणुकीवेळी स्व. मनोहर पर्रीकर यांनाही प्रश्न विचारायचे आणि चर्चा करायचे. ती तर खरी पणजीची संस्कृती आहे, असेही उत्पल पर्रीकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT