Goa Assembly elections 23 constituencies Dainik Gomantak
गोवा

राजकीय आरक्षणाच्या हक्कासाठी आदिवासी समाज रणांगणात उतरणार; आगामी विधानसभा निवडणुकीत 23 मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा ‘उटा’चा निर्णय

Goa Assembly elections 23 constituencies: विधानसभा निवडणुकीत आदिवासी बहुल २३ मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा निर्णय ‘उटा’ संघटनेच्या म्हार्दोळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंडा: आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण हा त्यांचा हक्क आहे आणि हा हक्क मिळवण्यासाठी प्रसंगी रणांगणात उतरताना सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकण्यात येईल, असा इशारा देताना विधानसभा निवडणुकीत आदिवासी बहुल २३ मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा निर्णय ‘उटा’ संघटनेच्या म्हार्दोळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला. म्हार्दोळ येथील पंचायतीच्या सभागृहात झालेल्या या उटाच्या मेळाव्याला आमदार गोविंद गावडे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, रोमाल्डो गोन्साल्वीस व उटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

गोविंद गावडे म्हणाले, की आदिवासी समाज प्रगतीपथावर वाटचाल करतो आहे, म्हणून हेतुपुरस्सर राजकीय आरक्षणाला खो घालण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला कुणाची भीक नको आहे, आम्हाला आमचा हक्क हवा आहे. राजकीय आरक्षणाची भीती काही लोकांना आहे. या लोकांचे राजकीय अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्याकडून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत ते हाणून पाडले पाहिजेत. आम्ही अभिमानी आहोत, स्वाभिमानी आहोत. आमचा हा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी समाजबांधवांनी एकजूट राखूया आणि समाजाला राजकीय आरक्षण (Reservation) मिळवून देऊया.

प्रकाश वेळीप म्हणाले, की सरकारने आदिवासी समाजाची थट्टा चालवली आहे. राजकीय आरक्षणाचे गाजर दाखवून आदिवासी समाजाची फसवणूक होत आहे. नव्वद टक्के आदिवासी समाज भाजपच्या पाठीशी उभा आहे, त्याला आता विचार करावा लागेल असे सांगून कुणाला तरी पुढे करून राजकीय आरक्षणाला खो घालण्याचा प्रकार होत आहे. विश्वास गावडे, रोमाल्डो गोन्साल्वीस, दुर्गादास गावडे व इतरांनी आपले विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून, घरफोड्या आणि अत्याचाराच्या घटनांमुळे काणकोणवासीयांमध्ये रोष, मूक आंदोलनातून सरकारचं वेधलं लक्ष; कठोर कारवाईची केली मागणी

Goa Political Alliance: विरोधकांचे आघाडीचे पाऊल; जागावाटप पुन्‍हा लांबणीवर! फॉरवर्ड, आरजीसोबतच्‍या बैठकीला गिरीश, युरींची दांडी

खरी कुजबुज: राजकारण्यांचे भक्त...

Indian History: भारताचा इतिहास वसाहतवादी चौकटीतून मुक्त करण्याची गरज; ‘सकाळ लिट फेस्ट’मध्ये प्रख्यात लेखक अमिश त्रिपाठी यांचे उद्गार

Amit Shah Speech: 'देशाची बदनामी करुन सत्तेत येता येणार नाही', अमित शहा यांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींच्या विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक

SCROLL FOR NEXT