Usha Vijai Sardesai Love Journey Dainik Gomantak
गोवा

Valentines Day 2026: मैत्रीच्या बळावर उभं राहिलेलं प्रेम! विजय सरदेसाई यांच्या आयुष्याची सुरेल धाग्याने विणलेली कहाणी..

Usha Vijai Sardesai Love Journey: काही नाती ही केवळ पती-पत्नीच्या चौकटीत न अडकता त्याही पुढे जातात. अशा नात्यांना मैत्रीची भक्कम पायाभरणी असते.

गोमन्तक डिजिटल टीम

काही नाती ही केवळ पती-पत्नीच्या चौकटीत न अडकता त्याही पुढे जातात. अशा नात्यांना मैत्रीची भक्कम पायाभरणी असते. गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि त्यांची चित्रकार पत्नी उषा सरदेसाई यांच्या आयुष्याची कहाणीही याच मैत्रीच्या सुरेल धाग्याने विणलेली आहे.

शाळकरी मैत्री ते जीवनसाथी

उषा आणि विजय यांची ओळख शाळकरी वयातच झाली. मडगाव येथील पॉप्युलर हायस्कूलमध्ये दोघेही शिक्षण घेत होते. त्या काळात इंग्लिश आणि फ्रेंच या विषयांसाठी ‘कोस्टा टीचर’ यांच्या घरी सर्व विद्यार्थी एकत्र येत.

त्या वातावरणात नकळत जुळलेली ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. उषा नववी-दहावी मडगावमध्ये शिकल्या; पण अकरावीला त्या वास्को येथील ‘एमईएस’मध्ये गेल्या, तर विजय मडगावच्या चौगुले विद्यालयात दाखल झाला. त्यामुळे दोघांमधला संपर्क काही काळासाठी तुटला होता.

अनपेक्षित लग्नाची मागणी

एक दिवस अचानक विजय ‘एमईएस’मध्ये उषाला भेटायला गेले आणि सरळ लग्नाची मागणी घातली. त्या काळात विजयबद्दल अनेक वदंता पसरलेल्या होत्या. त्यामुळे उषांनी तत्काळ होकार दिला नाही. उषा सांगतात, “विजयला माझ्यात काय आवडलं ते मला ठाऊक नाही. पण त्याच्यातला एक गुण मला आवडला. त्याला राग पटकन यायचा, तरी तो दुसऱ्यांच्या मनाचा विचार करायचा.”

दोघांचे स्वभाव भिन्न; तरीही...

अखेर डिसेंबर १९९५ मध्ये उषा आणि विजय यांचा विवाह झाला. पती-पत्नीच्या नात्यात अडकले, तरी मैत्री मात्र कायम राहिली. उषा आजही स्पष्टपणे म्हणतात, “विजय तेव्हाही माझा मित्र होता आणि आजही आहे.” दोघांचे स्वभाव भिन्न. पण, वेगवेगळे खांब मंदिराचा डोलारा सांभाळतात, तसेच भिन्न स्वभावांनीच त्यांच्या आयुष्याचा डोलारा अधिक मजबूत केला आहे.

आज त्यांच्या सहजीवनाकडे पाहताना जाणवते की प्रेमापेक्षा मैत्री जास्त टिकाऊ असते. परस्परांचा आदर, समज आणि संवाद यावर उभे राहिलेले हे नाते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. पती-पत्नीचे नाते जेव्हा मैत्रीतून फुलते, तेव्हा ते काळाच्या कसोटीलाही समर्थपणे तोंड देते आणि उषा व विजय सरदेसाई यांची कहाणी हेच सिद्ध करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT