Tisk Usgao Dainik Gomantak
गोवा

Tisk Usgao: तिस्क उसगाव रस्त्याची दुरवस्था; नागरिक संतापले

रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक अपघात

दैनिक गोमन्तक

उसगाव ते तिस्क बाजार मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. याबाबत नागरिकांनी आज संताप व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून या मुख्य रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. मात्र याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही अशी खंत नागरीकांनी व्यक्त केली.

(Usgaon Tisk Citizens requested that the road needs to be repaired)

याबाबत बोलताना नागरिक म्हणाले की, गेल्या काही महिन्यापासून या मुख्य रस्त्यावर अनेक अपघात रस्त्यातील खड्ड्यांमुळे झाले आहेत यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे उसगाव पंचायत तसेच पीडब्ल्यूडी खात्याने यात तातडीने लक्ष घालून ह्या रस्त्याची दुरुस्ती करावी असे नागरिकांनी म्हटले आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून अनेकदा पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला याची माहिती दिली. तरीही याकडे कोणाला यात लक्ष देण्यास वेळ नाही अशी तक्रार ही नागरिकांनी माध्यमांकडे केली.

सध्या उसगाव पंचायत ते तिस्क बाजार यादरम्यानच्या रस्त्याची अवस्था ही अपघातासाठी पोषक बनली आहे. त्याची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा एखाद्या नागरिकाचा यात बळी जाऊ शकतो अशी भीती यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. हा प्रश्न घेऊन आम्ही बऱ्याचदा माध्यमांमध्ये आवाज उठवला मात्र याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाही असे काही स्थानिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT