Christmas Special: गोव्यातील डेझर्टमधील सीक्रेट पदार्थ

 
गोवा

Christmas Special: गोव्यातील डेझर्टमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ

गोव्यातील गोड पदार्थांमध्ये नारळापासून बनवलेल्या गुळाचा वापर केला जातो.

Puja Bonkile

गोवा हा नेहमी पर्यटन स्थळ (Tourist Places) आणि गोवण पदार्थासाठी (Goan Food) ओळखला जातो. गरम भात आणि मासेपासून (Fish) ते खातखते( मिश्र भाजीपाली करी) तसेच इतर अनेक पदार्थ, जे राज्यासाठी अद्वितीय आहेत. तथापि गोव्यातील (Goa) स्थानिक बाजारपेठाणमध्ये (Goa Market) आढळणारे आणि विक्रेत्याद्वारे विकले जाणारे स्थानिक घटक हे या पदार्थांना (Food) इतके चवदार बनवतात.

शुक्रवारी म्हापसा (Mapusa) येथील मार्केटला भेट दिल्यास तुम्हाला स्थानिक पदार्थांची पसंत्ती कळेल. अशाच एक वेगळा घटक म्हणजे नारळाचा गूळ, जो नारळाच्या दुधापासून बनवला जातो. हा गूळ चवीला आणि दिसण्याला उसापासून बनवलेल्या गुळापासून अगदी वेगळा असतो. नारळाच्या दुधापासून बनवलेला हा गूळ पिरॅमिड आकाराचा असून काळ्या रंगाचा असतो.

गोवण गोड पदार्थ (Goan Dessert) बनवण्यासाठी या गुळाचा वापर केला जातो. यात डोडोल, पाटोळी, आले बेले आणि सन्नास या पदार्थांचा समावेश होतो. यामुळे या पदार्थांचा एक खास स्वाद येतो. तसेच मासेलदार पदार्थांची चव अधीक वाढण्यासाठी करीमध्ये सुद्धा हा गूळ (Jaggery) वापरला जातो.

coconut jaggery

* गूळ बनवण्याची पद्धत

तसे तर गूळ बनवणे ही एक कटाळवाणी प्रक्रिया आहे कारण नारळाच्या दुधाचे संकलन करणे खूप कठीण काम आहे. त्यानंतर गूळ बनवण्याची किचकट प्रक्रिया आहे. पंतालेओ फर्नांडिस (Pantaleo Fernandes) यांच्या गोव्यातील पारंपरिक पुस्तकात, नारळाचा गूळ किंवा मडके देव या प्रकरणामध्ये या प्रक्रियेचे तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांची सुरुवात डॅमोननेम नावाच्या मातीच्या भांड्यात दूध गोळा करण्यापासून होते. या भांड्यात पाम फ्रॉन्डसह चुना लावला जातो, कारण जेव्हा भांड्यात दूध गोळा केला जातो तेव्हा ते आंबू नये म्हणून लावला जातो. हे गोळा केलेले दूध नंतर भोपळ्याच्या कावचापासून बनवलेल्या भांड्यात टाकला जातो. नंतर हे दूध तासभर शिजवले जाते. की प्रकिया खूप क्लिष्ट आहे आणि त्यात अनेक स्टेप्स आहेत. या गुळाचा वापर फोव, गुलकंद, यासरखे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT