G20 Dainik Gomantak
गोवा

G20 Summit Goa 2023: आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य - तज्ज्ञांनी व्यक्त केले मत

‘जी-20’ मध्ये तज्ज्ञांची मते : आरोग्य कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीची सांगता

गोमन्तक डिजिटल टीम

G20 Summit Goa 2023: महामारीसारखी रोज नवनवी आव्हाने समोर येत आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य असून यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत अनेक तज्ज्ञांनी ‘जी-20’ बैठकीत व्यक्त केले.

जी-20च्या दुसऱ्या आरोग्यविषयक कार्यगटाच्या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी,  डिजिटल आरोग्य नवोन्मेषावर आधारित लक्षवेधी तांत्रिक सत्रे झाली.

यावेळी तीन पॅनल चर्चासत्रे झाली. पहिल्या सत्रात आरोग्य सेवेमधील  नवोन्मेष- तंत्रज्ञान हस्तक्षेपांच्या मदतीने आरोग्य सेवेचे वितरण यावर लक्ष केंद्रित केले. या सत्रात आरोग्य क्षेत्रातील प्रमुख तज्ज्ञांनी संपूर्ण जीवनचक्रामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

टेक्‍नॉलॉजीने सातत्यपूर्ण सेवा

रुग्णांमध्ये उत्तम गुण दिसून येण्यासाठी वास्तविक जगातील डेटा/पुराव्यांच्या संभाव्यतेचा उपयोग, या विषयावरील दुसऱ्या सत्रात तांत्रिक साधनांचे विविध विचारप्रवर्तक पैलू आणि ते चांगल्या रुग्ण सेवा वितरणात कसे वापरले जाऊ शकतात, यावर विचारमंथन करण्यात आले.

एकमेकांशी सुसंगत प्रणालीची गरज आणि राष्ट्रीय डिजिटल परिवर्तनासाठी सदस्य देशांनी व्यक्ती-केंद्रित डिजिटल उपाययोजना करण्याची गरज,  यावर चर्चा झाली.

‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’

या बैठकीमध्ये लोककेंद्रित दृष्टीकोन,  तंत्रज्ञान-सुलभ सातत्यपूर्ण आरोग्य सेवा,  डिजिटल विभाजन यासारख्या इतर समस्यांसह त्यावरील उपाययोजनांवर भर देण्यात आला.

‘वसुधैव कुटुंबकम’,  अथवा ‘एक पृथ्वी,  एक कुटुंब,  एक भविष्य’,  या भारताच्या  जी-२० अध्यक्षतेखालील संकल्पनेला अनुसरून या चर्चेमध्ये गतिमान जागतिक आणि स्थानिक सहकार्यामधून ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ यावर भर देण्यात आला.  तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करावे, असे ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT