CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ''तंत्रज्ञानाचा वापर जनसेवेसाठी गरजेचा'' मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर, सायमन फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी आयटी क्षेत्राचे महत्त्व आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनन्यसाधारण आहे. राज्यातील १२१ हून अधिक सरकारी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. जेणेकरून शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या सुविधा पोहचाव्यात. तंत्रज्ञानाचा वापर हा जनसेवेसाठी करणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सवांत यांनी व्यक्त केले.

ते कॉम्प्युटर डीलर फोरम ऑफ गोवा संघटनेद्वारे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘जी-टेक’ तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी आयटी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये, वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर, सायमन फर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, राज्यात आयटीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि जिज्ञासूंसाठी हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त आहे. शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञानाशी निगडीत व्यक्तींनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्प्युटर डीलर फोरम ऑफ गोवाचे अध्यक्ष सायमन फर्नांडिस यांनी केले. ३० हून अधिक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन येथे भरविले आहे.

राज्यात आयटी कल्चर निर्माण करणार !

आजच्या युगात सर्वाधिक श्रीमंत हे ‘आयटी’ क्षेत्राशी निगडीत व्यक्ती आहेत. राज्यात सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थी आयटीचे शिक्षण घेत आहेत. १५० हून अधिक आयटी कंपन्या आहेत. २०० हून अधिक ‘आयटी’तील स्टार्टअप आहेत.

गोवा सरकार राज्यात आयटी कल्चर निर्माण करण्याचे प्रयत्न करत असून मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्त्वात हे लक्ष्य आम्‍ही निश्‍चितपणाने साध्य करू,असे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT