Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : गोव्यात अमली पदार्थांची पाळेमुळे पोचली गावागावांपर्यंत

सिंथेटिक ड्रग्‍सचा वापरामुळे 62 गुन्हे दाखल; राजधानी पणजीही बदनाम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : काही वर्षांपूर्वी अंमलीपदार्थांचा व्यवहार प्रामुख्याने किनारी भागांमध्ये दिसून येत होता. आता हे लोण राजधानी पणजीसह राज्यभर पसरलेले दिसतेय. सत्तरीसारख्या दुर्गम भागातील पेडलर पोलिसांच्या जाळ्यात सापडू लागल्याने या व्यवहाराची पाळेमुळे खोलवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत पोलिसांनी 62 गुन्हे दाखल करत सुमारे अडीच कोटींचे 98 किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. आता तरी अंमलीपदार्थविरोधी पथकासह नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोने अधिक सतर्क होणे गरजेचे आहे.

विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात येजा असणाऱ्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा व्यवहार होत आहे. उत्तर गोव्यात कांदोळी, कंळगुट, बागा, हणजूण, वागातोर तर दक्षिण गोव्यात कोलवा, वार्का, पाळोळे, मोबोर या किनाऱ्यांचा त्‍यात प्रामुख्‍याने समावेश होतो. मात्र आता राज्यातील प्रमुख शहरांपासून सत्तरी, सांगे, काणकोण या ग्रामीण व दुर्गम भागासह राजधानी पणजीही मागे नाही हे पोलिसांनी केलेल्या कारवाया आणि दाखल केलेले गुन्ह्यांच्या आधारे स्पष्ट होतेय. सिंथेटिक ड्रग्‍सचाही वापर वाढला आहे.

पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी विभागाने चालू वर्षी जानेवारी ते जून 2022 या काळात 52 गुन्हे दाखल केले असून 92 किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये 72 किलो गांजा आहे. यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या गुन्ह्यांमध्ये 54 नागरिकांना अटक करण्‍यात आली असून त्‍यात 11 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. शिवाय स्थानिकांचाही त्‍यात हात आहे, ही यातील सर्वांत गंभीर बाब होय. अंमलीपदार्थ गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून पोलिस दलाच्या अंमलीपदार्थविरोधी पथक आणि एनसीबी यांनी 2017 मध्ये 168 गुन्हे नोंद केले होते. 2018 मध्ये 222, 2019 मध्ये 218 तर 2020 मध्ये 229 गुन्हे नोंद झालेले आहेत.

पणजीतील मिरामार, कांपाल, मळा परिसर विळख्‍यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवापिढी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा वापर करत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये ग्राहकांपेक्षा पुरवठादारांवर लक्ष केंद्रित होते. मात्र ग्राहकांवर कारवाई खूप कमी होताना दिसते. शिवाय मोठ्या जनजागृतीची गरज असतानाही ती दिसत नाही. काही बिगरसरकारी संस्था यासाठी प्रयत्न करत असल्या तरी त्यांचे प्रयत्न अत्यल्प आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून राज्‍यात सर्व प्रकारचे अंमलीपदार्थ मिळत असल्याचे स्पष्ट होते. त्‍यात गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी टॅबलेट आणि पावडर, कोकेन, हशिश, हेरॉईन यांचा समावेश आहे. राजधानी पणजीतील मिरामार, कांपाल आणि फोंतेनास मळा भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंमलीपदार्थ सापडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT