Ganesh Idols Making  Dainik Gomantak
गोवा

गणेशमूर्ती बनवण्यासाठी चिकण मातीचा वापर करा : आमदार प्रवीण आर्लेकर

Ganesh Idols Making :पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मूर्तिकार यांनी केवळ चिकण मातीचा वापर करून गणेश मूर्ती बनवाव्यात असे आवाहन हस्तकला महामंडळाचे चेअरमन तथा पेंडणे मतदार संघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

दैनिक गोमन्तक

मोरजी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मूर्तिकार यांनी केवळ चिकण मातीचा वापर करून गणेश मूर्ती बनवाव्यात, असे आवाहन हस्तकला महामंडळाचे चेअरमन तथा पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी गांधी तीर खारेबंद पेडणे येथील गणेश मूर्तिकार अरुण पालयेकर यांच्या चित्र शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी स्थानिक पत्रकारांकडे संवाद साधताना सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, पर्यावरणाचे प्रत्येकाने रक्षण करावे. हल्ली मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात विकल्या जातात. मूर्तिकारांनी आणि ग्राहकांनी या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती न घेता केवळ चिकण मातीचा वापर केलेल्या गणेश मूर्ती घ्याव्यात.

हस्त कलाकारांच्या ज्या-ज्या समस्या असतील, जे-जे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. शिवाय अनुदानही वेळेवर मिळवण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

गोव्याच्या पर्यायाने पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात हस्त कलाकार आहेत. याची जाणीव आपल्याला आहे; आणि या कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवाय त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. शिवाय योग्य ती मदत करण्यातही आपण पुढे असणार असल्याचे आमदार आर्लेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT