Sawantwadi 
गोवा

Sawantwadi: 'त्या' अमेरिकन महिलेवर आता गोव्यात उपचार, USA दूतावासाने घेतली गंभीर दखल

Sawantwadi, Sindhudurg: सोनुर्ली – रोणापाल येथील जंगलात साखळदंडांच्या मदतीने झाडाला लॉकने महिलेला बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Pramod Yadav

सावंतवाडीतील सोनुर्ली – रोणापाल येथे घनदाट जंगलात मूळ अमेरिकन वृद्ध महिला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रकृती ढासळलेल्या या महिलेला उपचारासाठी गोव्यात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी दुपारी महिलेला बांबोळीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हालविण्यात आले. महिलेसोबत घडलेल्या या अमानविय घटनेची गंभीर दखल अमेरिकन दूतावासाने घेतली आहे.

सोनुर्ली – रोणापाल येथील जंगलात साखळदंडांच्या मदतीने झाडाला लॉकने महिलेला बांधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महिला मोठ्या किंचळत असताना एका गुराख्याच्या हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांच्या मदतीने ललिता कायी कुमार एस या अमेरिकन महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन दिवस उपाशीपोटी पावसात असलेल्या महिलेची प्रकृती ढासळल्याने तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिकट झाल्याने तिला बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तपासात महिलेजवळ मोबाईल आणि टॅब व 31 हजार रुपये रोख सापडले आहेत. पोलिस मोबाईच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत.

अमेरिकन दुतावासाने घेतली दखल

अमेरिकन दुतावासाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे जोमाने फिरविण्यास सुरुवात केली आहे.

घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक टीम तमिळनाडू येथे तर दुसरी टीम गोव्यात रवाना करण्यात आली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात त्यामुळे गोव्यात देखील याचा तपास केला जाईल. तर महिला गेल्या दहा वर्षापासून तमिळनाडूत वास्तव्यास असल्याने तिथेही तपासाच्या दृष्टीने पोलिस दाखल झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT