Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Hill Cutting: राज्यातील सर्व डोंगरकापणी 'बेकायदेशीर'! टीसीपी खात्याची मंजुरीच नाही; मंत्री राणेंचे स्पष्टीकरण

Minister Vishwajit Rane: राज्यातील सर्व डोंगरकापणीचे प्रकार बेकायदा झालेले असून यातील एकाही प्रस्तावाला टीसीपी खात्याने मंजुरी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील सर्व डोंगरकापणीचे प्रकार बेकायदा झालेले असून यातील एकाही प्रस्तावाला टीसीपी खात्याने मंजुरी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले. यापुढेही नगर नियोजन खाते कुठेही डोंगरकापणीला मंजुरी देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कुडतरी येथील डोंगरकापणीचे प्रकार मंत्री राणे यांना त्यांच्या मंत्रालयातील कक्षात जाऊन त्यांच्या निदर्शनास आणले.

या प्रस्तावात बेकायदेशीरपणा आढळून आल्यास या कोणत्याही प्रस्तावाला मान्यता दिली जाणार नाही हे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. राणे म्हणाले की, मागच्या तीन चार महिन्यांत आम्ही एकही डोंगरकापणी प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. असे प्रकार रोखण्यासाठी ग्रेडियंटमध्ये वाढ करण्याचीही आमची तयारी आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही तेच धोरण आहे. गोव्यातील डोंगर आम्हाला राखून ठेवायचे आहेत, असे राणे म्हणाले. मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात डायोलेसिस सुविधांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ पण त्यापूर्वी सासष्टीतील सर्व आमदारांना विश्वासात घेऊ, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT