Job Dainik Gomantak
गोवा

Jobs in Goa : गोव्यातील अप्रशिक्षित युवकांना लवकरच मिळणार रोजगार

जुने गोवेत शुक्रवारी कार्यशाळा; नामवंत औद्योगिक अस्‍थापनांशी करणार करार

गोमन्तक डिजिटल टीम

Jobs in Goa : ‘औद्योगिक विकास व कौशल्याची साथ’ या विषयावर राज्याच्या कौशल्य विकास खात्याने शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी जुने गोवे येथे खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्‍हणून तर आयएएस अधिकारी सरप्रित सिंग गिल सन्माननीय अतिथी म्हणून उपस्‍थित राहणार आहेत, अशी माहिती या खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी दिली.

गोव्यातील अप्रशिक्षित युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी काही नामवंत औद्योगिक अस्‍थापनांशी करार करण्याचे ठरविले आहे. या कार्यशाळेत या उद्योगांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली. कार्यशाळेत बेरोजगारांना रोजगाराच्‍या संधी देण्यासाठी योजना बनविली जाईल असे ते म्हणाले. गोव्यातील उद्योग सरकारला पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी सर्वांनाच हवे असतात. ते पुरविण्यासाठी सरकार सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी भरती मेळावे, प्रशिक्षण शिबिरे आणि कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात शिक्षित युवक खूप आहेत, पण सगळेच प्रशिक्षित व कौशल्य असलेले असतील असे नाही. नोकरी मिळविण्यासाठीच कौशल्य प्राप्त करायला हवे असेही नाही. सरकार प्रशिक्षण द्यायला सदैव तयार आहे. केंद्राच्याही अनेक योजना आहेत. त्याचा लाभ प्रत्‍येक युवकाने घेतला पाहिजे, असे देसाई म्‍हणाले.

साखळी, पणजीत मार्गदर्शन कार्यक्रम

औद्योगिक क्षेत्रात महिलांनी आघाडी घ्यावी यासाठी 7 नोव्हेंबर रोजी साखळी रवींद्र भवनात महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमात महिला उद्याजकांना मार्गदर्शन करतील. 8 नोव्हेंबर रोजी पाटो-पणजी येथील सांस्‍कृतिक भवनात महिला स्वंयसाहाय्‍य गटांना आमंत्रित करण्यात आले आहे. आयटीआयने निवडलेल्या ब्रँड ॲम्‍बेसेडरना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याची माहिती देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT