Rain In Surla Dainik Gomantak
गोवा

Rain In Surla: तांबडीसुर्लात कोसळल्या पावसाच्या सरी

Rain In Surla: तापमान घटले; पण उष्मा कायम; दोन दिवस वातावरणात बदल नाही

दैनिक गोमन्तक

Rain In Surla:

साकोर्डा, तांबडीसुर्ला भागात शनिवारी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, तर काही भागांत तुरळक सरी बरसल्या. राज्यातील कमाल तापमानाचा पारा 32.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल तापमानात घट झालेली दिसून आली.

साकोर्डात सुमारे दीड तास पडलेल्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गेले काही दिवस उष्म्याने हैराण झालेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला. सकाळी अचानक पडलेल्या पावसामुळे बोट्टर येथील उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी साकोर्डा येथे दुचाकीवरून जाताना बोळकर्णे येथे घसरून पडल्याने किरकोळ जखमी झाले.

राज्यात शुक्रवारी 34.6 अंश तापमानाची नोंद केली होती. आज आर्द्रतेतही 2 टक्क्यांनी घट झाली. पुढील तीन-चार दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात मोठे बदल घडणार नाहीत.

राज्यातील हवामान कोरडे राहील. तसेच पहाटे राज्यातील काही भागांत धुके पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. आज पणजी येथे कमाल 32.8, तर किमान 25.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

शीतपेयांकडे वळू लागली पाऊले
राज्यात शनिवारी संमिश्र वातावरण जाणवले. काही ठिकाणी प्रचंड उष्मा जाणवत होता, तर काही ठिकाणी उकाड्याची तीव्रता कमी जाणवत होती. अंगाची लाही लाही होत असल्याने असह्य उष्‍म्यापासून बचावासाठी लोक शीतपेय सेवन करत आहेत. त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली असून रसवंती गृह, कोल्ड्रिंक हाऊस, आईस्क्रीम पार्लरवर गर्दी दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT