Bhumika Temple Ashwem Dainik Gomantak
गोवा

Ashwem News: देव कोंडला...कोंडला...! आश्वे येथे श्री भूमिका मंदिराला अज्ञाताने ठोकले टाळे? परिसरात तणाव

North Goa: या प्रकरणात गटबाजी देखील समोर आली असून, आश्वेतील दोन गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

Pramod Yadav

पणजी: उत्तर गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आश्वे येथील श्री भूमिका मंदिराला अज्ञाताने ठाळे ठोकल्याची घटना उघडकीस आल्याने गोंधळ उडाला. मंदिराला टाळे कोणी ठोकले? यावरुन संतप्त झालेले स्थानिक मंदिर परिसरात एकत्र आले. बुधवारी (०२ ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Police Force Deployed At Bhumika Temple Goa

समोर आलेल्या माहितीनुसार, श्री भूमिका मंदिराला बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञाताने टाळे ठोकल्याची घटना उघडकीस आली. टाळे ठोकल्याची माहिती समोर आल्यानंतर गावातील स्थानिक आणि भाविक मंदिराजवळ एकत्र आले.

मंदिराला टाळे कोणी ठोकले यावरुन परिसरात गोंधळ निर्माण झाला. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होताच मामलेदार आणि पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणात गटबाजी देखील समोर आली असून, आश्वेतील दोन गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

मंदिराचा पूर्वीचा टाळा बदलून त्याजागी नवा टाळा रात्री दोनच्या सुमारास लावल्याचा आरोप गावातील एका गटाने केला आहे. दरम्यान, दुसऱ्या गटाने नवरात्रीच्या निमित्ताने सुरक्षेच्या काराणास्तव टाळा लावण्याची माहिती दुसऱ्या गटाने दिली आहे.

टाळा ठोकल्याच्या घटनेवरुन मंदिर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, मोठा पोलिस फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT