Drowning Incident Goa Dainik Gomantak
गोवा

Bastora Drowning Case: बस्तोडा पुलाजवळ आढळला अज्ञात मृतदेह; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

Mapusa News: अद्याप हा मृतव्यक्ती कोण आहे किंवा याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याचा शोध लागलेला नाही.

Akshata Chhatre

बार्देश: म्हापसा, बार्देश येथे मंगळवारी (दि. २१ जानेवारी) रोजी सकाळी एक मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह किनारी आणला. अद्याप हा मृतव्यक्ती कोण आहे किंवा याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याचा शोध लागलेला नाही.

बार्देश म्हापसा येथे झालेल्या हा घटनेची माहिती पणजी अग्निशामक दलाला देण्यात आली, यानंतर त्यांनी म्हापशातील अधिकाऱ्यांना घटनास्थानी जाऊन आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सुरज शेटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली.

दरम्यान पथकाला एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना देखील देण्यात आली होती, सध्या म्हापसा पोलिसांच्या वतीने पांढरी चोपडेकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पाण्यात सापडलेला मृतदेह सर्वात आधी शवविच्छेदनासाठी म्हापशातील आझिलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर तोच पणजीत गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी सुरज शेटगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सकाळी ९ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती देणारा फोन आला.

घटनास्थळी दाखल होताच त्यांना एका व्यक्तीचा मृतदेह ग्रीनपार्क हॉटेल, गिरी येथील पाण्यात तरंगताना आढळला. पोलिसांच्या उपस्थितीत हा मृतदेह किनारी आणण्यात आला. हा मृतव्यक्ती नेमका कोण आहे याचा अजून पत्ता लागलेला नाही, मात्र तो साधारण ५० ते ५५ वर्षांचा असण्याची शक्यता सुरज शेटगांवकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: "मोपा विमानतळावरील ९ दुकाने स्थानिक चालवत नाहीत" युरी

Bicholim: डिचोली शहराला कचऱ्याचे ‘ग्रहण’! बाजारात दुर्गंधी, जनावरांचा वाढला उपद्रव

Aldona: 'फुटसाल मैदानाची जागा बदला'! हळदोणे ग्रामस्थांची मागणी; फेरेरांनी केले पर्यायी जागा सुचवण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT