Mhadei River Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: कर्नाटकला 'म्हादई'प्रश्नी दहा दिवसांत दुसरा धक्का! गोवा सरकारला दिलासा

Mhadei Dispute: गोवा सरकारने केलेल्या पाणी वळवण्याच्या आरोपांवर कर्नाटकाकडून मंत्रालयाने खुलासा मागितला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी ७१ हेक्टर जंगल क्षेत्र वापरण्यास परवानगी मागणारा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने परत पाठवला आहे.

गोवा सरकारने केलेल्या पाणी वळवण्याच्या आरोपांवर कर्नाटकाकडून मंत्रालयाने खुलासा मागितला आहे. याआधी कर्नाटकाच्या या प्रस्तावाला मान्यता देण्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने नकार दिला होता. मंडळाने गोवा सरकारच्या खटल्यांचा संदर्भ दिला होता. कर्नाटकाला गेल्या दहा दिवसांत म्हादईप्रश्नी बसलेला हा दुसरा धक्का आहे.

जंगल क्षेत्र वापरण्‍यास परवानगी नाकारल्‍याने कर्नाटक सरकारच्‍या कुटनीतीला लगाम लागेल, अशी अपेक्षा आहे; तर दुसरीकडे गोवा सरकारला हा मोठा दिलासा आहे. यापूर्वी वन्‍य जीव मंडळाकडून नकार मिळाल्‍यानंतर कर्नाटक सरकारने सर्वपक्षीय शिष्‍टमंडळ दिल्‍लीला नेण्‍याचे योजले; तेवढ्यात केंद्रीय वन मंत्रालयाने अन्‍य प्रस्‍ताव नाकारून नियमांच्‍या कक्षेत राहण्‍याबाबत कर्नाटक सरकारला सुचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT