Goa River  Dainik Gomantak
गोवा

Goa Rivers: गोव्यातील 4 नद्यांचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकास करणार; केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती

26 राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार

Akshay Nirmale

Goa Rivers: गोव्यातील चार नद्यांचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकास करण्याचे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे. अशी माहिती, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी संसदेत दिली.

सोनोवाल यांच्या माहितीनुसार, कुंभारजुआ नदी (कुठ्ठाळी फेरी ते साओ मथियास), मांडवी नदी (उसगाव पूल ते अरबी समुद्र) आणि झुआरी नदी (सावर्डे पूल ते मुरगाव बंदर) हे जे चालू जलमार्ग आहेत, ते पहिल्या टप्प्यातील विकास आणि देखभालीच्या कामासाठी हाती घेण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरानुसार, शापोरा नदी (मनेरी गाव ते मोरजी, अरबी समुद्र) हा एक कार्यरत जलमार्ग 2030 पर्यंत विकसित केला जाईल. जे काम हाती घेण्यात आले आहे त्यात कुंभारजुआ नदी 17 किमी, मांडोवी नदी 41 किमी, झुआरी नदी 50 किमी आणि शापोरा नदी 25 किमी मार्गांचा समावेश आहे.

सोनोवाल म्हणाले की, देशातील नदी प्रणाली ही एक टिकाऊ आणि किफायतशीर वाहतूक मार्ग आहे.

देशभरातील 24 राज्यांमध्ये पसरलेल्या पाच विद्यमान आणि 106 नवीन अशा 111 जलमार्गांना एप्रिल 2016 मध्ये राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आले होते. सोनोवाल यांच्या मते नवीन राष्ट्रीय जलमार्गांचा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाला आहे.

ते म्हणाले की, व्यवहार्यता अभ्यासाच्या आधारे निवडलेल्या राष्ट्रीय जलमार्गांबाबतचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण करण्यात आला आहे.

अभ्यास अहवालांच्या परिणामांवर आधारित 26 व्यवहार्य राष्ट्रीय जलमार्गांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे आणि 20 राष्ट्रीय जलमार्गांचा विकास हाती घेण्यात आला आहे, असे मंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT