World Table Tennis Dainik Gomantak
गोवा

World Table Tennis: जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गोव्यात दाखल

स्पर्धेचा आजचा अंतिम सामना, टेबल टेनिस बॉल स्पर्धेतील विजेत्यांना अनुराग ठाकूर हे पुरस्कार प्रदान करणार

गोमन्तक डिजिटल टीम

World Table Tennis स्तूप या स्पोर्ट्स अॅनालिटिक्स कंपनीने गोव्यात प्रथमच जागतिक टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. अशा प्रकारची ही देशातील पहिलीच स्पर्धा आहे. 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत गोव्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे या कंपनीने या खेळासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर केला आहे. आज या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेचा समारोपाचा दिवस असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे या समारोप समारंभासाठी गोव्यात आले आहेत. या टेबल टेनिस बॉल स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करणार आहेत.

या स्पर्धेबाबत स्पर्धेच्या सह प्रयोजकांनी असं सांगितलं की, गोव्यातील WTT साठी 4,000 हून अधिक तिकिटे विकली गेली असून VIP आसन सोडल्यास तिकिटांसाठी 49 ते 499 रुपये इतका वाजवी दर होता. स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही दिवसांत मात्र स्टेडियममध्ये अक्षरशः रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्या.

तर स्तूप कंपनीच्या अधिकाऱ्यांनी से सांगितले की, भारतात खेळाला अजूनही कमी दर्जाचा दिला जातो. भारतात क्रिकेटशिवाय बहुतेक खेळांना कमी दर्जा दिला जातो. पण बॅडमिंटन आणि कबड्डी खेळाच्या स्पर्धांचे आयोजन पाहता टेबल टेनिस या खेळालाही चांगले दिवस येऊ शकता, आणि WTT हे त्याची नांदी आहे.

सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले दीपक मलिक हे या स्पर्धेबाबत म्हणाले कि, खेळाडूंची जागतिक क्रमवारी पाहिल्यास, 11 ते 21 वर्षांखालील टॉप 10-20 रँकिंगमध्ये भारतीय ज्युनियरांची संख्या चांगली आहे.

तसेच भारतात फक्त 5,000 नोंदणीकृत टेबल टेनिस खेळाडू आहेत, परंतु मला असा विश्वास वाटतो की, भारतीय खेळाडूंची संख्या अचूकपणे मोजल्यास ती 4 ते 5 लाख इतकी जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT