Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: घात की अपघात? वास्कोत रेल्वे रुळानजीक आढळला अनोळखी इसमचा मृतदेह

Vasco Railway Track Death: वास्को-सडा पुलाखालच्या ड्रेनेज परिसरात रेल्वे रुळांच्या बाजूला ५५ ते ६० वयोगटातील एक अनोळखी पुरुष व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला.

Sameer Amunekar

वास्को: अवर लेडी ऑफ वालंकनी चॅपलजवळ वास्को-सडा पुलाखालच्या ड्रेनेज परिसरात रेल्वे रुळांच्या बाजूला ५५ ते ६० वयोगटातील एक अनोळखी पुरुष व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला.

वास्को पोलिसांना स्थानिक रहिवासी, ब्रागांझा यांचा फोन कॉल आल्यानंतर ही घटना उघडकीस आली, त्यांना घटनास्थळाजवळ एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती दिली.

पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत डोके आणि शरीरावर जखमा असलेला दिसला. सदर व्यक्तीचा मृत्यू वास्को-सडा पुलावरून पडल्यामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरून काही लोकांनी १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्या व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालयात चिखली येथे हलवण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पोलिस यासंंदर्भात अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT