Deadbody Foung in Near Surla Ferry Dainik Gomantak
गोवा

सुर्ला फेरीजवळ अज्ञाताचा मृतदेह तरंगताना आढळला

पुरुषाचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती, पोलीस घटनास्थळी दाखल

दैनिक गोमन्तक

पणजी : साखळी सुर्ला फेरीजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. हा मृतदेह पुरुषाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेत तपास सुरु केला आहे.

साखळीजवळील (Sanquelim) सुर्ला फेरी पॉईंटजवळ आज सोमवारी सकाळी एक मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांनी याची माहिती लगेच पोलिसांना दिली. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. दरम्यान हा मृतदेह एका पुरुषाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरु असून ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपासही पोलीस करत आहेत.

दरम्यान गेल्या आठवड्याभरात तीन मृतदेह गोव्यात (Goa) सापडले आहेत. यापैकी कुडणे येथील एकाने खाणबंदीमुळे बेरोजगारी आल्याने जीवन संपवत असल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. तर दुसरीकडे पेडणे तालुक्यातील भटवाडी-कोरगाव येथील डोंगराळ भागात काल रविवारी सकाळी रशियन नागरिकाचा मृतदेह आढळून आला होता. आता हा तिसरा मृतदेह सापडल्याने गोवा पोलिसांपुढे (Goa Police) तपासाचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT