Goa mining संग्रहित छायाचित्र
गोवा

870 खाण कामगारांवर बेरोजगारीचे संकट

वेदांताचा केंद्र सरकारला अर्ज

दैनिक गोमन्तक

मडगाव : ‘राज्य सरकारने खाणी बंद करण्याचा आदेश दिल्याने आमच्या कंपनीतील कामगारांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी द्या’, अशी मागणी वेदांता सेसा कंपनीने केंद्र सरकारकडे केली आहे. यासाठी तीन महिन्यांची नोटीस देण्यात आली असून ऑक्टोबरपर्यंत आपले सर्व कामकाज बंद करण्याचे संकेत वेदांताने याचिकेत दिले आहेत.

सरकारने आमची लिजेस बंद करून खाणीवरील सर्व सामग्री काढून घेण्याचा आदेश दिल्याने. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे. आमची कंपनी ही कामगारांची हित पाहणारी असून गोव्यातील खाण व्यवसायावर काही तरी तोडगा निघेल अशी आमची आशा होती.

- जोसेफ कुयेलो, सरव्यवस्थापक, वेदांता कंपनी

आता पाणी नाकापर्यंत पोहोचले आहे. निदान आतातरी सरकारने गप्प न बसता एक तर लिलाव करून किंवा महामंडळ स्थापन करून खाणी सुरू कराव्या आणि कामगारांना न्याय द्यावा.

पुती गावकर, कामगार नेते

वेदांताच्या गोव्यात तीन कंपन्या चालत असून त्या अंतर्गत आठ खाणी चालतात. कंपनीने कामकाज बंद केल्यास 870 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. वेदांता कंपनीचे सरव्यवस्थापक जोसेफ कुयेलो म्हणाले, ‘आम्ही 2018 पासून कामगारांना कामावर ठेवले होते.

पण 4 मे 2022 रोजी खाण खात्याने आमचे सर्व व्यवहार बंद करून खाणीवरील यंत्रसामग्री काढून घ्या अशी नोटीस दिली. जेणेकरून आमच्यासमोर दुसरा पर्याय बाकी नाही.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT