santacruz photo
santacruz photo 
गोवा

बेरोजगार झालेले तरुण वळले शेतीकडे! 

Dainik Gomantak

पणजी

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर जगामधील सर्व देशांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्याचा फटका गोव्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. काही कंपन्या बंद झाल्या व परदेशात नोकरीच्या मागे धावणारी तरुण पिढी बेरोजगार झाली आहे. उदारनिर्वाहचा पर्याय म्हणून अनेक युवा तरुण शेतीकडे वळू लागले आहेत. 
सांताक्रुझ येथील ओसाड जमिनीत भातशेती पिकवण्यासाठी त्या भागातील तरुणांनी मशागत करण्यास सुरुवात केली आहे. 
भारत हा कृषिप्रधान देश असूनही अनेक गावातील तरुण पिढी शेतात राबण्यापेक्षा पांढरपेशा नोकऱ्यांसाठी शहरात गेली तर काही झटपट 
पैसा मिळवण्याच्या नादात विदेशात गेले. मात्र कोरोना या महामारी साथीमुळे अनेकजण आपल्या मूळ देशात तसेच गावाकडे परतले आहे. कंपन्या बंद पडून बेरोजगार झाल्याने कुटुंबाचा उदारनिर्वाह करणे आवाक्याबाहेर होऊ लागले व अनेकजण मूळ गावी जाऊन शेती करण्याकडे वळत आहेत. सांताक्रुझ येथील काही तरुण गोव्यातील काही नामांकित हॉटेलमध्ये कामाला होते मात्र ती बंद आहेत त्यामुळे उदारनिर्वाहाचे काहीच साधन नसल्याने ते शेती करण्यास पुढे सरसावले आहेत. 
ताळगाव व सांताक्रुझ या मतदारसंघातील जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेली शेतीजमीन गेली कित्येक वर्षापासून ओसाड पडली होती. या शेतजमिनीत कोणतेच पीक घेतले जात नव्हते. नोकरी असल्याने जमीन मालकाने तसेच त्यांच्या मुलांनीही पाठ फिरविली होती. मात्र कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर अनेक युवा तरुण बेरोजगार बनले आहेत. मिळणारे वेतन बंद झाले व पुन्हा हातांना काम कधी मिळेल याची शाश्‍वती नाही अशा द्विधा स्थिती असलेल्या सांताक्रुझ येथील तरुणांनी एकत्रित येत शेतीकडे मोर्चा वळविला आहे. त्यांनी यापूर्वी कधीही शेतीमध्ये काम केले नव्हते मात्र त्यांना आता हातात फावडे घेऊन भातपिकासाठी जमीन तयार करण्याची पाळी आली आहे. 
यासंदर्भात शेतीमध्ये काम करणाऱ्या काही तरुणांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, स्वतःची जमीन असूनही त्यामध्ये शेती पीक घेण्याचे कधी वाटले नव्हते. देशात तसेच गोव्यात अशा या महामारीमुळे बेरोजगाराची पाळी येईल असा विचारही कधी मनात आला नव्हता. मात्र या महामारीने सर्वानाच दगा दिला आहे. रोजगार कधी मिळेल याचा थांगपत्ता नाही त्यामुळे बेरोजागर राहून नोकरी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत राहण्यापेक्षा निदान स्वतःची शेतजमीन आहे त्यात पीक घेतल्यास कुटुंबालाच हातभार लागू शकतो, असे मत व्यक्त केले. 
सध्या राज्यात मॉन्सून सुरू झाला नसला तरी गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे शेतजमीन ओली झाली आहे व पाणी साचले आहे. त्यामुळे भाताची रोपटी लावण्यासाठी शेतामध्ये मातीचा चिखल तयार करण्याचे काम काही तरुण फावडे घेऊन काम करत होते. त्यांच्यामध्ये काम करताना उत्साह होता. आता या तरुणांना नोकरीपेक्षा शेतजमिनीचे महत्त्व कळले. यापुढे नोकरी केली तरी जमिनीत शेतीबरोबर इतरही हिंवाळी व उन्हाळी पिके घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे या तरुणांनी माहिती दिली. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT