Well  Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक; गोव्यात काकाने पुतण्याला ढकलले विहिरीत

पाण्याची पातळी खूपच खालावली असून विहिरीच्या आत गाळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

कुडतरी : मडगाव येथील चौदा वर्षीय किशोरला त्याच्या काकांनी स्कूटरवरून एका निर्जन ठिकाणी आंबे तोडण्याच्या बहाण्याने नेले आणि सुमारे 12 मीटर खोल असलेल्या विहिरीत ढकलून दिले.

सुमारे दोन तास प्रयत्न करून किशोर विहीरीतून सुखरूप बाहेर आला. दरम्यान, किशोर तीनदा पाण्यात पडला पण हार न मानता चौथ्या प्रयत्नात तो बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत घरी खेळत असताना, त्याचा काका बसवराज कागी याने त्याला त्याच्या दुचाकीवरून कुष्ठरोग रुग्णालयाजवळील कुडतरी येथे एका निर्जनस्थळी नेले. आणि आंबे तोडण्याच्या बहाण्याने त्याला विहिरीत ढकलले. विहीरीतून बाहेर येताच तो जवळच्या एका घरात गेला. त्या लोकांनी किशोरला अन्न आणि कपडे दिले. पाण्याची पातळी खूपच खालावली असून विहिरीच्या आत गाळ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT