Panchayat Elections in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पंचायत निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे गोंधळाचे वातावरण

ग्रामसभेत औपचारिकता : पंचांना स्वारस्य नाही; विकासही रखडणार

दैनिक गोमन्तक

फोंडा : निवडणुका कधी होणार, याचा मागमूस नसल्यामुळे सध्या राज्यातील पंचायती अनिश्चितच्या गर्तेत सापडल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण दिसत आहे. (uncertainty about panchayat election in Goa)

फोंडा तालुक्यातील काही पंचायतींच्या ग्रामसभा संपल्या असून काही व्हायच्या आहेत. पण या ग्रामसभेत औपचारिकताच जास्त दिसते. पंचमंडळी आपण त्या गावचे नव्हेच, अशा रीतीने वावरताना दिसतात. याचा अनुभव कुर्टी खांडेपार येथे आला. या ग्रामसभेला ११ पैकी पाच पंच गैरहजर होते. स्क्रॅप यार्डचा विषय ऐरणीवर असूनसुध्दा हे पंच अनुपस्थित राहिले. कारवाई करायची तर पंचांची मुदत संपत आली आहे.

‘ट्रिपल टेस्ट’ पर्याय : परत निवडणुका कधी होणार हे माहिती नसल्यामुळे एरवी शिगेला पोहचलेल्या प्रचारातही आता शिथिलता आली आहे. निवडणूक आयोगाने आरक्षणाशिवाय निवडणूक घ्या, असे सांगितले असले तरी सरकार हा सल्ला मान्य करेल असे वाटत नाही. कारण याविरुध्द न्यायालयात याचिका दाखल होऊ शकते. त्यामुळे आता सरकारपुढे ‘ट्रिपल टेस्ट’ करूनच ही निवडणूक घेण्याचा पर्याय राहिला आहे. हे पाहता या निवडणुका मुदतीत होतील असे वाटत नाही.

पंचायत निवडणुका मुदतीत व्हाव्यात. वास्तविक सरकारने ही प्रक्रिया आधीच पार पाडायला हवी होती. आता आरक्षणाच्या घोळामुळे या निवडणुका पुढे जाऊ शकतात. याचा परिणाम गावाच्या विकासावर होऊ शकतो. आता काही उपाय योजता येतो का, हे बघणे सरकारच्या हातात आहे.

- घन:श्‍याम नाईक, प्रियोळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT