Ultimatum by Contract Electricity workers  Dainik Gomantak
गोवा

सेवेत कायम न केल्यास कामगारदिनी धडक मोर्चा

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : वीज खात्यामध्ये गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याच्या मागणीसाठी आज वीज कर्मचारी संघटनेतर्फे विद्युत भवनसमोर धरणे धरण्यात आले. मागील सरकारने या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचे आश्‍वासन दिले होते, ते पूर्ण करावे. या मागण्या प्राधान्यक्रमाने पूर्ण न केल्यास वीज विभाग कार्यालयासमोर धरणे धरण्यात येतील, तसेच आयटकच्या नेतृत्वाखाली 1 मे रोजी कामगारदिनी धडक मोर्चा पणजीत काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे नेते ॲड. राजू मंगेशकर यांनी दिला.

वीज खात्यामध्ये सुमारे 324 कर्चमाऱ्यांना हेल्पर म्हणून घेण्यात आले आहे. हे कर्मचारी 10 ते 20 वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करत आहे. सरकारने त्यांना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन दिल्याने ते रात्रंदिवस काम करत आहेत. यातील काहीजण 45 वर्षावरील आहेत त्यांना सेवेत कायम करण्यासाठी वयोगटात शिथिलता द्यावी. निवडणुकीपूर्वी (Election) सरकारने वीज खात्यात सुमारे 500 जागा हेल्पर्ससाठी जाहिरातद्वारे प्रसिद्ध केल्या होत्या. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवून या जागा भरण्याचा सरकारचा प्रयत्न होता मात्र तो सफल होऊ दिला जाणार नाही. अनेक वर्षे खात्यामध्ये निरंतर सेवा बजावत असलेल्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी मंगशेकर यांनी केली.

वीज (Electricity) खात्यात हेल्परचा जागा मागील दाराने भरण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी डिसेंबर २१ मध्ये संघटनेतर्फे आंदोलन करून विरोध केला होता. त्यावेळी सरकारने या कर्मचाऱ्यांबाबत न्याय केला जाईल असे आश्‍वासन दिले होते. त्यावेळी या कर्मचाऱ्यांनाही लेखी परीक्षा व मुलाखतींना उपस्थित राहण्यास सांगून त्यांना प्राधान्य दिले जाईल असे सांगण्यात आले होते मात्र तो फार्स होता. सरकारने (Goa Government) या कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतीत सेवेत घेण्यासाठी हस्तक्षेप करावा. नव्या मंत्र्यांनीही लक्ष घालावे. जोपर्यंत या कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रश्‍न सोडविला जात नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन वेळोवेळी सुरू ठेवले जाणार आहे. वीज मुख्य अभियंता हे नवे आहेत, त्यांना हा प्रश्‍न माहीत नसला तरी त्यांनी तो जाणून घ्यावा. यापूर्वीच्या वीज मुख्य अभियंत्यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल, असे सांगितले होते त्यानुसान त्यांनीही मंत्र्यांकडे या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत चर्चा करावी असे मंगेशकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT