गोवा

Goa Accident: सेरावली-वेर्णा येथे दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू, तर तेरेखोल नदीत कोसळली कार

कार नदीत कोसळल्याची सारमानस नंतर दुसरी घटना

Pramod Yadav

Goa Accident: सेरावली - वेर्णा येथे दुचाकीच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, तेरेखोल धक्क्यावरून पर्यटक कार नदीत कोसळल्याची सारमानस नंतर दुसरी घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

सेरावली-वेर्णा येथे दुचाकी आणि सायकलचा अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या आंतानिओ मास्कारेन्हस (वय 73, रा. शिर्ली) या वृद्ध सायकलस्वाराचे निधन झाले आहे.

याप्रकरणी मोहम्मद खान (रा. चिंबल) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर, सारमानस येथील फेरीबोटीच्या धक्क्याजवळ कार नदीत कोसळल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी आणखी कार धक्क्यावरून नदीत जाण्याची घटना घडली.

तेरेखोल येथील फेरीधक्क्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पर्यटक कार नदीत कोसळली. फेरीबोटीवरील कर्मचारी व येथील नागरिकांनी कार नदी पात्रातून बाहेर काढली. उत्तर प्रदेशमधील कारचालक ध्रुव राकेश मित्तल याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT