Bashudev Bhandari Canva
गोवा

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

गोमन्तक डिजिटल टीम

बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणात सहभागी असावेत या संशयावरुन पोलिस मुख्यालयात दोन युवकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांच्या हाती नेमके काय हाती लागले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी ही चौकशी केली. हे प्रकरण दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयापर्यंत पोहोचल्यानंतर या प्रकरणी तपासकाम करण्यावर पोलिसांवरील दबाव वाढला आहे.

साखळी येथे गोवा इन्सिस्ट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील एक विद्यार्थिनी, दोन विद्यार्थी व बाशुदेव यांनी महाविद्यालयालगतच्या हॉटेलमध्ये ३१ ऑगस्टच्या रात्री जेवण घेतल्यानंतर बाशुदेव त्या विद्यार्थिनीसोबत पणजीच्या दिशेने जाताना चुकीचे वळण घेतल्याने सांतइस्तेव फेरी धक्का परिसरात ती कार बुडाली. त्या दुर्घटनेतून ती युवती वाचली, मात्र तेव्हापासून बाशुदेव बेपत्ता आहे. त्याचे पालक नारायण व भाऊ बलराम यांनी या तपासाचा आढावा घेण्यासाठी गोव्यात तळ ठोकला आहे.

दरम्यान, ३१ ऑगस्टच्या रात्री बाशुदेवसोबत जेवणावेळी असलेल्या दोन तरुणांची आज चौकशी करण्यात आली. ते हॉटेलमध्ये आधीच गेले होते की, नंतर गेले. आधी ते कळंगुटला जाणार होते. नंतर त्यांनी बेत का बदलला. त्यांना या दुर्घटनेची माहिती कशी मिळाली,अशी विचारणा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SGPDA Market: मांस विक्रेत्यांना ‘एसजीपीडीए’ खुले; गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली मान्यता

SCROLL FOR NEXT