Mandovi River Car Accident Goa: बेपत्ता बाशुदेवसोबतची तरुणी गुजरातला गेल्याचे पोलिस तपासातून उघड!

Bashudev Bhandari Missing Case: मांडवी नदीत कार बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव नारायण भंडारी सोबत गाडीत असलेली युवती गोवा सोडून पालक व काकांसोबत गुजरातला गेल्याचे उघड झाले आहे.
Mandovi River Car Accident Goa: बेपत्ता बाशुदेवसोबतची तरुणी गुजरातला गेल्याचे पोलिस तपासातून उघड!
mandovi river
Published on
Updated on

मांडवी नदीत कार बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव नारायण भंडारी सोबत गाडीत असलेली युवती गोवा सोडून पालक व काकांसोबत गुजरातला गेल्याचे उघड झाले आहे. बाशुदेवच्या पालकांनी पोलिस महासंचालक आलोक कुमार व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांची पोलिस मुख्यालयात जाऊन भेट घेतली. नदीत बुडालेल्या बाशुदेवचा शोध घेण्यासाठी उद्यापासून नदीत खोलवर शोध घेणारी यंत्रणा वापरली जाणार असल्याचे पोलिसांनी बाशुदेवच्या पालकांना सांगितले.

बाशुदेवचे वडिल नारायण सध्या गोव्यात आलेले आहेत. आज बाशुदेवची आई उमादेवी, वडिलबंधू बलराम आणि नातेवाईक आशुमतीबेन परमार गोव्यात पोचले. त्यांनी नारायण यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केले. त्यांनी जुनेगोवे पोलिस ठाण्याला भेट घेत या बाशुदेवचा शोध घेण्यातील प्रगती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर पुन्हा त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Mandovi River Car Accident Goa: बेपत्ता बाशुदेवसोबतची तरुणी गुजरातला गेल्याचे पोलिस तपासातून उघड!
Mandovi River: मांडवी नदीत उडी मारण्याचा तरुणीचा प्रयत्न, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

बाशुदेवच्या कारमधील युवतीच्या कुटुंबीयांवर नारायण यांनी बाशुदेवच्या बेपत्ता होण्याप्रकरणात संशय व्यक्त केला आहे. तसा तक्रार अर्ज त्यांनी जुनेगोवे पोलिसात दिलेला आहे. त्यांनी आज ती युवती गोव्यात आहे का, याची माहिती काही जणांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्‍न केला. त्यावेळी आई वडील व काकांसह ती युवती गुजरातला निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत त्यांनी पोलिसांशी चर्चेवेळी चिंता व्यक्त केली. पोलिसांनी यावर नंतर चर्चा करू, असे आश्वासन त्यांना दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com