Kapil Nayak

 

Dainik gomantak

गोवा

निरीक्षक कपील नायक यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची दोन महिलांची तक्रार

निरीक्षक नायक यांनी आपल्याला 'गावडी' असे म्हटल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : फातोर्ड्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार फातोर्ड्यातील दोन एसटी महिलांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांच्याकडे केली असून नायक यांच्याविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

इनासिया कुलासो व दितोजा फालेरो या दोन महिलांनी आज ही तक्रार दिली आहे. निरीक्षक नायक यांनी आपल्याला 'गावडी' असे म्हटल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

गोवा फॉरवर्डने गुरुवारी काढलेल्या मोर्चावेळी हा प्रकार घडल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आम्ही फातोर्डा चौकावरून घरी जात असताना वाटेत गोंधळ झाल्यामुळे आम्ही थांबलो असता, नायक यांनी आपल्याला उद्देशून 'गावड्यानो गपचूप घरी जा अन्यथा तुम्हाला अटक करून तुरुंगात टाकू 'असे म्हटल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे.

निरीक्षक नायक हे आम्हाला धमकावत असल्याचे पाहून आमदार (MLA) विजय सरदेसाई यांनी त्यांना लोकांना पोलिसी खाक्या दाखवू नका असे समजावण्याचा प्रयत्न केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.

गुरुवारी गोवा फॉरवर्ड (Goa Forward) कार्यकर्त्यानी मतदारसंघातील कामे बंद ठेवल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला होता. त्यावेळी सरदेसाई आणि निरीक्षक नायक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी विजय सरदेसाई (Vijay Sardesai) आणि इतर 100 जणांवर सरकारी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखले व सार्वजनिक रस्ता अडविला असा ठपका ठेऊन गुन्हा नोंद केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT