Monsoon Update in Goa Dainik Gomantak
गोवा

वास्को, मांगूरहील येथे उन्मळून पडले दोन वृक्ष; एका रेंट अ कारसह तीन वाहनांचे नुकसान

तिन्ही वाहनाचे मिळून पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Pramod Yadav

गोव्यात शनिवारपासून पडत असलेल्या पावसामुळे लहान मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. वास्कोत स्वतंत्रपथ मार्गावर आज (रविवारी) पहाटे जीर्ण झालेला अशोका वृक्ष मुळापासून उन्मळून पडला. यात एका रेंट अ कारचे नुकसान झाले. तर मांगूरहील येथे वृक्ष उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले.

मांगूर हिल येथे यात रात्री 12 वाजता मांगूर स्पोर्टस् क्लब जवळ एक वृक्ष उन्मळून पडल्याने तीन वाहनांचे नुकसान झाले. (जीए 06 के 2407, कीया सोनेट) ही दिनेश गुरव याच्या मालकीची कार, (जीए 06 डी 9232, होंडा सीटी), मनोज गुहा यांच्या मालकीची तर (जीए 06 डी 3520, स्वीफ्ट डिझायर) सियाराम सिंग यांच्या मालकीची, तिन्ही वाहनांवर वृक्ष कोसळल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली. तिन्ही वाहनाचे मिळून पाच लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान दुसऱ्या एका घटनेत आज पहाटे 6.15 वाजता स्वतंत्रपथ मार्गावर एक जीर्ण झालेले अशोका वृक्ष मुळापासून उन्मळून पडला. यात गोपाळ बछेड यांच्या मालकीच्या बलेनो कार (जीए 06 ई 9814) चे 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वास्को अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले. तर या दोन्ही घटनात पाच लाख 35 हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यास यश आल्याचे सांगण्यात आले.

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा उडाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मुरगाव पालिकेतर्फे सध्या युद्धपातळीवर गटार सफाईचे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी गटारे उपसण्यात आली असून त्यातून काढलेली माती तसेच इतर घाण गटाराच्या बाजूला ठेवण्यात आली होती. आज पहाटे पडलेल्या पावसाने सदर माती वाहून परत गटारात गेली, पावसामुळे कामे करण्यास अडचणी येत आहे.

दरम्यान स्वतंत्र पथ मार्गावर अजूनही जीर्ण झालेले अशोका वृक्ष असून ते केव्हाही उन्मळून पडू शकत यासाठी पादचा-यांनी, वाहनचालकांनी सावधगीरी बाळगावी असे आवाहन समाजसेवक शंकर पोळजी यांनी केले आहे. आपले वाहन या झाडा शेजारी पार्क करू नये असा सल्ला त्यांने वाहनचालकांना दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT